Assembly Speaker :विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून नार्वेकरांनी संधी

राहुल नार्वेकर हे राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांचे जावई आहेत. नार्वेकर निवडून आल्यास विधानपरिषदेचे सभापतीपद आणि विधानसभेचे अध्यक्षपद अनुक्रमे सासरे-जावई यांनी भूषवल्याचा योग साधला जाईल.
Rahul Narvekar
Rahul NarvekarAgrowon
Published on
Updated on

मुंबई : मुख्यमंत्रीपदाची माळ एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) गळ्यात घालणे, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना उपमुख्यमंत्रीपदाच्या घोड्यावर बळजबरीने बसवणे या पाठोपाठ भाजपने आणखी एक धक्का दिला आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) या युवा आमदाराला उमेदवारी दिली आहे. पूर्वी शिवसेनेत असलेल्या आणि त्यावेळी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेल्या नार्वेकर यांना उमेदवारी देऊन भाजपने शिवसेनेला शह दिल्याचे मानले जात आहे.

विधासनभा अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी जुन्या-जाणत्या अनुभवी आमदाराची निवड करण्याऐवजी नार्वेकर यांच्यासारख्या तरूण आमदाराची निवड करण्यात आली आहे. जवळपास दहा दिवस चाललेल्या राजकीय नाट्यानंतर शिवसेनेचा शिंदे गट आणि भाजपने राज्यात सरकार स्थापन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी शपथविधीनंतर मंत्रिमंडळाची बैठक घेतली. त्यामध्ये तीन व चार जुलै रोजी विधानसभेचे विशेष अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

Rahul Narvekar
Maharashtra Political crisis : अपात्रता याचिकेवर तातडीने सुनावणीस नकार :शिंदे सरकारला दिलासा

या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची (Assembly Speaker) निवड केली जाणार आहे. कॉंग्रेसचे नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्तच होते. मागच्या अधिवेशनात राज्यपालांनी अडवून ठेवल्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक होऊ शकली नाही. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirval) यांच्याकडे अध्यक्षपदाचा कार्यभार होता.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर १६ आमदारांना अपात्र ठरवण्याचा मुद्दा सत्तानाट्याच्या केंद्रस्थानी आला. हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे. राज्यात नवीन सरकार स्थापन झाले असले तरी आमदारांच्या अपात्रतेची टांगती तलवार सरकारवर कायम आहे. ज्या आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली आहे, त्यात विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे. आमदारांच्या अपात्रतेची कारवाई नवे अध्यक्ष रद्द करू शकतात, त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाला (Assembly Speaker) खूप महत्त्व आलं आहे.

विधानसभेचे अध्यक्षपद भाजपकडे असणार असून त्यासाठी भाजपतर्फे आमदार राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली. शुक्रवारी राहुल नार्वेकरांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून त्यानुसार, महाराष्ट्र विधीमंडळाचे ३ आणि ४ जुलै रोजी विशेष अधिवेशन पार पडणार आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीला अध्यक्षपदाची निवडणूक पार पडेल. त्यानंतर ४ जुलै रोजी बहुमत चाचणी पार पडेल.

Rahul Narvekar
Maharashtra Political Crisis: हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही; उध्दव ठाकरे यांचे खडे बोल

दरम्यान भाजपकडून ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांना विधानसभा अध्यक्षपदाची संधी देण्यात येईल, अशी चर्चा होती. विखे पाटील हे भाजपचे हेवीवेट नेते असून काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या विखे पाटील यांना अध्यक्षपद देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन केले जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र आता भाजपने नार्वेकर त्यांना संधी दिल्याने शिंदे- फडणवीस मंत्रिमंडळात विखे यांना एखादे महत्वाचे खाते दिले जाण्याची शक्यता आहे.

राहुल नार्वेकर हे राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik nimbalkar) यांचे जावई आहेत. नार्वेकर निवडून आल्यास विधानपरिषदेचे सभापतीपद आणि विधानसभेचे अध्यक्षपद अनुक्रमे सासरे-जावई यांनी भूषवल्याचा योग साधला जाईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com