Food Park : नारायणगावला फुडपार्क उभारण्याचा प्रस्ताव

Food Processing : नारायणगावला फुडपार्क उभारण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून लवकरच राज्य शासनाला सादर केला जाण्याची शक्यता आहे.
Food Park
Food ParkAgrowon

Pune News : नारायणगावला फुडपार्क उभारण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून लवकरच राज्य शासनाला सादर केला जाण्याची शक्यता आहे.

टोमॅटो आणि इतर भाजीपाला उत्पादनावर प्रक्रिया करण्यासाठी नारायणगाव येथे फुडपार्क उभारण्यासाठी वाव आहे.

कृषिदिनाच्या निमित्त जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासमोर हा विषय मांडला. शिवनेरी आंब्याला फळपीक विमा योजना लागू करण्याचा आग्रहदेखील श्री. प्रसाद यांनी धरला. या दोन्ही प्रस्तावांसाठी शासनाकडे मी पाठपुरावा करेल, असे आश्वासन कृषिमंत्र्यांनी या वेळी दिले.

Food Park
Textile Park : गुंतवणुकीसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उभाराव्यात

पुणे जिल्हा नियोजन समितीतून जुन्नर येथील शिवनेरी आंबा आणि पुरंदर अंजीरला यापूर्वीच भौगोलिक मानांकन (जीआय टॅगिंग) मिळाले आहे. नारायणगाव भागात मोठ्या प्रमाणात टोमॅटोचे उत्पादन घेतले जाते.

Food Park
Food Park: औरंगाबादच्या ऑरिकमध्ये १७८ एकरांवर फूड पार्क

या भागातून हंगामात देशभर टोमॅटो पुरविला जातो. मात्र, भाव नसल्यास टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ येते. त्यामुळे टोमॅटोसाठी स्वतंत्र फूड पार्क उभारण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे.

‘राज्य शासन अनुकूल’

‘फुडपार्क उभारणीसाठी सविस्तर प्रस्ताव तयार करण्यासाठी राज्य शासन अनुकूल असावे लागते. तशी अनुकूलता पालकमंत्री व कृषिमंत्र्यांनी दर्शविली आहे. त्यामुळे प्रस्ताव तयार करण्याचे काम लवकरच सुरु केले जाईल,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com