Organic Farming : सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन

Pesticide Use In Agriculture : शेतीमध्ये सातत्याने होत असलेला रसायनांचा अतिरिक्त वापर, परिणामी जमिनीचा पोत खालावला असून या रासायनिक कीटकनाशकाच्या फवारणीचे मानवी आरोग्यावरही दुष्परिणाम होत आहेत.
Organic Farming
Organic Farming Agrowon
Published on
Updated on

Latest Agriculture News : शेतीमध्ये सातत्याने होत असलेला रसायनांचा अतिरिक्त वापर, परिणामी जमिनीचा पोत खालावला असून या रासायनिक कीटकनाशकाच्या फवारणीचे मानवी आरोग्यावरही दुष्परिणाम होत आहेत. याला पर्याय म्हणून सेंद्रिय व जैविक शेतीस चालना देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन या योजनेची सुरुवात तळा तालुक्यात करण्यात आली आहे.

जैविक शेती मिशन योजनेचा कालावधी हा चार वर्षांचा असणार आहे. ही योजना राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असल्याने मोठ्या प्रमाणात शेतीचे क्षेत्र सेंद्रिय शेतीमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे.

यासाठी कृषी विभागाकडून वेगवेगळ्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवल्या जाणार असून त्यासाठी तालुक्यातील जास्तीत ज्यास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे यांनी केले आहे.

Organic Farming
Organic Farming : सेंद्रिय उत्पादनासह यशस्वी विक्री व्यवस्था

पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान, मोठ्या क्षेत्रावरचे प्रमाणीकरण व कृषी विकास योजनेतून सेंद्रिय शेतीच्या प्रसारासोबतच त्यातील शेतीमालाच्या वितरणासाठी व्यवस्था निर्माण करण्यात येईल. यामुळे रसायन अवशेषमुक्त फळे, भाजीपाला आणि अन्नधान्य

Organic Farming
Organic Farming : जमिनीमध्येच तयार करा सेंद्रिय घटक

उपलब्ध होईल. सेंद्रिय शेतीसाठी कमी खर्चाचे तंत्रज्ञान विकसित करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, पिकांचे अवशेष वापरून शेतातच सेंद्रिय शेती निविष्ठा तयार करण्याची प्रणाली विकसित करणे, तिचा प्रसार करणे, शेतकऱ्यांना दर्जेदार सेंद्रिय निविष्ठा योग्य पद्धतीने वापरण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध करणे, सेंद्रिय शेतमालाच्या वितरणासाठी बाजारपेठ आणि स्वतंत्र विक्री व्यवस्था निर्माण करणे, सेंद्रिय शेतीमालाच्या निर्यातीस प्रोत्साहन देणे आदी या योजनेची उद्दिष्ट्ये असतील.

शेतकऱ्यांना विविध स्तरावर प्रशिक्षण

एकाच गावात किमान २० शेतकऱ्यांचा ५० हेक्टरचा एक गट या प्रमाणे गट करण्यात येईल. सोबतच एका मंडळात १० गटांची नोंदणी करण्यात येईल. त्यासाठी एक गट प्रवर्तक, गट मार्गदर्शक व तज्ज्ञ प्रशिक्षकाची निवड केली जाईल.

एका शेतकऱ्याला कमाल २ हेक्टरपर्यंत लाभ दिला जाईल. सहभागी शेतकऱ्यांना लागवड ते काढणीपर्यंत किमान ३ वेळा प्रशिक्षण दिले जाणार आहे. सेंद्रिय शेतीसाठी लागणाऱ्या सर्व निविष्ठा कशा तयार कराव्यात, याबाबत प्रशिक्षण, शेतीचे प्रमाणीकरण करून शेतीमालाचे ब्रँडिंग करण्यात येणार आहे.

जैविक शेती मिशन योजनेमध्ये तळा तालुक्यासाठी ५०० हेक्टर लक्षांक प्राप्त असून गट तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. या योजनेंतर्गत लागवड ते काढणी, ब्रँडिंग व मार्केटिंग, प्रमाणीकरणापर्यंत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येईल.
- आनंद कांबळे, तालुका कृषी अधिकारी तळा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com