Sharad Pawar Latest : विकासकामांसाठी शेतजमिनीच्या अतिवापराने उत्पादन धोक्यात

Agriculture Development : लोकसंख्येत देश जगात प्रथम क्रमांक मिळवत असताना कृषी क्षेत्रात मात्र मागे जात आहे. दिवसेंदिवस शेतजमीन कमी होत असून विकासकामांसाठी शेतजमिनींचा अतिवापर त्यासाठी कारणीभूत ठरू लागला आहे.
Sharad Pawar
Sharad PawarAgrowon

Amravati News : लोकसंख्येत देश जगात प्रथम क्रमांक मिळवत असताना कृषी क्षेत्रात (Agriculture Sector) मात्र मागे जात आहे. दिवसेंदिवस शेतजमीन (Agriculture Land) कमी होत असून विकासकामांसाठी शेतजमिनींचा अतिवापर त्यासाठी कारणीभूत ठरू लागला आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना आता अपुऱ्या पडू लागल्याने शेतीचे उत्पादन (Agriculture Production) वाढविण्यासोबतच उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत महात्मा ङ्कुले अ‍ॅग्रिकल्चर फोरमच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी पदवीधर संघटनेच्या प्रथम राज्यस्तरीय अधिवेशनात रविवारी (ता. २३) पवार बोलत होते. खासदार पवार यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्‍घाटन झाले.

या वेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री अनिल देशमुख, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, कृषी तज्ज्ञ डॉ. माळी, माजी कृषी आयुक्त प्रभाकर देशमुख, आमदार शेखर निकम, आमदार अशोक पवार, माजी मंत्री वसुधा देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके व्यासपीठावर उपस्थित होते.

Sharad Pawar
Sharad Pawar On Ajit Pawar : 'मी काय सांगतो ते महत्त्वाचं' ; अजित पवारांविषयीच्या चर्चांना शरद पवारांचा पूर्णविराम?

खासदार पवार म्हणाले, की स्वातंत्र्यानंतर ८० टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून होती. ५६ टक्के जमीन पिकाखाली होती. दिवसेंदिवस हे प्रमाण कमी होत आहे.

विकासकामांसाठी शेतजमीन घेतली जाते, त्याचा परिणाम उत्पादनावर होत आहे. अन्नधान्याच्या क्षेत्रात स्वावलंबी झालेल्या देशावर आता धान्य आयातीची वेळ येऊ लागली आहे.

शेतकरी आत्महत्यांच्या मुद्द्यावर प्रकाश टाकताना ते म्हणाले, की आत्महत्या रोखण्याकरिता कर्जमाफीसारख्या उपाययोजना आता अपुऱ्या पडू लागल्या आहेत. उत्पन्नाचे साधन वाढवावे लागणार आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar : सर्वोच्च न्यायालयाची समितीच ‘जेपीसी’पेक्षा पारदर्शी

त्यासाठी आधुनिक संशोधनावर भर देऊन शेतकऱ्यांना चांगले बियाणे, खते, कीटकनाशके व शेतीमालास योग्य भाव देणे गरजेचे आहे. त्यामुळेच परदेशातून आयात पद्धत बदलू शकणार आहे.

अधिवेशनात झालेल्या ठरावातील काही ठराव केंद्र तर काही राज्य सरकार स्तरावरील आहेत. यावर मुंबईत चर्चा करून दोन्ही सरकारकडे या मागण्या शेतकऱ्यांच्या असल्याचे मांडून त्याचा पाठपुरावा करू, असे आश्वासन या वेळी त्यांनी दिले.

कृषी पदवीधर हा महत्त्वाचा धागा असल्याचा उल्लेख करीत त्यांनी संघटनेने प्रश्न सुटण्यास मदत होते व शेतकऱ्यांचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी या फोरमचा उपयोग होणार असल्याचेही ते म्हणाले.

Sharad Pawar
Sharad Pawar : शेतकऱ्यांच्या संधी उद्ध्वस्त करणे हेच सरकारचे धोरण

यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी कृषी आयुक्त प्रभाकर देशमुख यांचीही समायोचित भाषणे झाली. हर्षवर्धन देशमुख यांनी स्वागतपर भाषण केले. अधिवेशनाची प्रस्तावना राज्य समन्वयक प्रभाकर देशमुख यांनी मांडली तर अधिवेशनाचे समन्वयक सुधीर राऊत यांनी प्रास्ताविक केले. अधिवेशनाला विदर्भ, मराठवाड्यासह राज्यभरातून कृषी पदवीधर उपस्थित होते.

अधिवेशनातील ठराव

* शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याकरिता शून्य टक्के व्याजदराने कर्जपुरवठा.

* ठिबक सिंचन संचासाठी ९० टक्के अनुदान देणे.

* नियमित व पुरेसा वीजपुरवठा करणे.

* शेतीमालास मूल्यवर्धित भाव मिळणे, साठवणूक केंद्र उभारणे.

* पिकांवरील कीड व रोग नियंत्रण करण्यासाठी संशोधन सहाय.

* शेतीसाठी पक्के पाणंद रस्ते बांधून देणे.

* पशू व पक्ष्यांपासून पीक संरक्षण व वीमा संरक्षण मिळवून देणे.

* शेतकऱ्यांनी स्वयंरोजगार निर्माण करणे.

* कृषी विद्यापीठांमध्ये हवामान संशोधक व तज्ज्ञांची नियुक्ती करणे.

* पीक कर्ज वेळेवर उपलब्ध करून देणे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com