Agrowon News
Agrowon News Agrowon

Road Winding : आधी पुनर्वसन; मगच रस्ता रुंदीकरण

Rehabilitation : पूर्वमधील सिद्धार्थनगर ते काटेमानेवली- तिसगाव नाका ते सिद्धार्थनगर या यू टाईप रस्तारुंदीकरणाबाबत केडीएमसीने प्रक्रिया सुरू केली आहे.

Kalyan News : पूर्वमधील सिद्धार्थनगर ते काटेमानेवली- तिसगाव नाका ते सिद्धार्थनगर या यू टाईप रस्तारुंदीकरणाबाबत केडीएमसीने प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार याबाबत हरकती आणि सूचना नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले होते.

त्यानुसार गुरुवारपर्यंत २०० हून अधिक बाधितांनी पालिका मुख्यालयामधील नागरी सुविधा केंद्रात येऊन आपल्या हरकती नोंदवण्यास सुरुवात केली आहे. तसेच आमचे आधी पुनर्वसन करा; मग रस्तारुंदीकरण करा, असा आक्रोश बाधित नागरिक करत होते.

Agrowon News
Alibag Land Acquisition: अलिबाग तालुक्यात प्रकल्‍पासाठी घेतलेल्‍या जमिनी १७ वर्षांपासून पडीक

कल्याण पूर्वमधील यू टाईप रस्त्याबाबत केडीएमसीने जाहिरात प्रसिद्ध करत त्या रस्त्याचे रुंदीकरणाची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार या रुंदीकरणात बाधित होणाऱ्या नागरिकांना हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी १८ मे पर्यंतची मुदत दिली आहे. या रस्त्याच्या कामामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांनी हरकती आणि सूचना नोंदवण्यास सुरुवात केली आहे.

Agrowon News
Land Acquisition : सुरत-चेन्नई महामार्ग भूसंपादनाच्या वाढीव मोबदल्याचा तिढा सुटणार

पालिका मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्रात गर्दी बाधितांची गर्दी होत आहे. त्यानुसार गुरुवारपर्यंत २०० हून अधिक बधितांनी आपल्या हरकती आणि सूचना नोंदवल्या आहेत.

आमचा रस्तारुंदीकरणाला पहिल्या दिवसापासून विरोध नाही. बाधित नागरिकांनी मागील वर्षीही हरकती नोंदवल्या आहेत. त्याचे काय झाले? पुन्हा रस्तारुंदीकरणाचा विषय आल्याने नागरिक भयभीत आहेत; पण पहिले आमचे पुनर्वसन येथेच करा; अन्यथा या कामाला आमचा विरोध राहील.

- दुर्गेश फडोळ, बाधित व्यापारी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com