Agriculture Pump
Agriculture PumpAgrowon

Agriculture Electricity : वऱ्हाडात ३ हजार ९५० कृषिपंपांच्या जोडण्या प्रलंबित

मागील काही महिन्यांमध्ये शेतकऱ्यांना कृषिपंपाच्या १ लाख ४ हजार ७०४ नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५४ हजार वीजजोडण्या केवळ गेल्या तीन महिन्यांमध्ये दिल्या आहेत.

Agriculture Pump Electricity Connection बुलडाणा : मागील काही महिन्यांमध्ये शेतकऱ्यांना कृषिपंपाच्या (Agriculture Pump) १ लाख ४ हजार ७०४ नवीन वीजजोडण्या (Electricity Connection) देण्यात आल्या आहेत.

त्यापैकी ५४ हजार वीजजोडण्या केवळ गेल्या तीन महिन्यांमध्ये दिल्या आहेत. हा वेग आणखी वाढवून येत्या मार्चपर्यंत जास्तीत जास्त कृषिपंपाच्या नवीन वीजजोडण्या देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

सद्यःस्थितीत वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशीम या जिल्ह्यांत सुमारे तीन हजार ९५० कृषिपंपाच्या वीजजोडण्या प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे.

मार्च २०२२ पर्यंत पैसे भरून प्रलंबित असलेल्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना नवीन वीजजोडण्या येत्या मार्चपर्यंत देण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार महावितरणने या सर्व वीजजोडण्या देण्यासाठी विविध योजनांचा समावेश असलेला कृती आराखडा तयार केला.

Agriculture Pump
Spray Pump : आता बसून करता येणार फवारणी !

शासनाने दिलेले उद्दिष्ट निर्धाराने गाठण्यासाठी युद्धपातळीवर कामेदेखील सुरू केली आहेत. अकोला, बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांमध्ये मार्च २०२२ पर्यंत पैसे भरून प्रलंबित असलेल्या कृषिपंपाना ३१ मार्चपर्यंत वीजजोडण्या देण्याचे उद्दिष्ट आहे.

Agriculture Pump
Agriculture Pump Electricity : ‘महावितरण’ने २८ हजारांवर नादुरुस्त रोहित्रे बदलली

यासाठी महावितरणचे अधिकारी व संबंधित कंत्राटदार यांनी कृषिपंपाच्या नवीन वीजजोडण्यांच्या कामांना अधिक वेग द्यावी, असे आदेश देण्यात आले आहे.

सध्या अकोला जिल्ह्यात ६५०, बुलडाणा जिल्ह्यात १९००, तर वाशीम जिल्ह्यातील १४०० कृषिपंपासाठी पैसे भरलेले आहेत. या प्रलंबित असलेल्या नवीन वीजजोडण्या २८ फेब्रुवारीपर्यंत कार्यान्वित करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com