
सांगली ः जिल्ह्यात गत महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे (Rain) खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बाधित झालेल्या पिकांचे संबंधित विभागाकडून पंचनामे सुरू झाले असून आतापर्यंत १९१ गावांतील १९ हजार १३९ शेतकऱ्यांचे ९ हजार ३२२ हेक्टरवरील पिकांचे पंचमाने करण्यात आले आहेत, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
जिल्ह्यात १ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत परतीचा पाऊस झाला. अनेक ठिकाणी अतिवृष्टीदेखील झाली. यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, भुईमूग, हळद, भाजीपाल्यासह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे बाधित झालेल्या पिकांचे तातडीने पंचमाने करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. सर्वाधिक नुकसान तासगाव तालुक्यातील २३ हजार ४२४ शेतकऱ्यांचे झाले आहे.
पंचमाने सुरू केल्यानंतर बाधित झालेले क्षेत्रात जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, कृषी विभागाने नजर अंदाजे किती गावात, किती शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, याची माहिती तालुक्याकडून संकलित केली. त्यानंतर तातडीने पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. सध्या नजर अंदाजे ३१५ गावांतील ४५ हजार ३६८ शेतकऱ्यांचे १७ हजार ३६७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वच गावांतील पिकांचे पंचनामे झाल्यानंतर बाधित क्षेत्राची आकवडेवारी स्पष्ट होईल.
परतीच्या पावसाने तालुकानिहाय नजर अंदाजे बाधित पिकांचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)
तालुका गावांची संख्या शेतकरी संख्या बाधित क्षेत्र
मिरज ३४ ९९५ ३२३.३०
वाळवा ७८ ४६०४ ११३९.७०
पलूस ३५ २७३० ११०.६
तासगाव ६९ २३४२४ ९४४८
कडेगाव १२ १०५ ३०
खानापूर ५ ३६ .१७.७०
जत २२ २०९६ ११७२.२०
कवठे महांकाळ ६० ११५६० ५१२६
एकूण ३१५ ४५३६८ १७३६७.३०
परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू केले आहेत. तातडीने पंचमाने पूर्ण करण्यासाठी आदेश दिले असून लवकरच पंचमाने पूर्ण होतील.
- प्रकाश सूर्यवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.