यवतमाळ : संततधार पाऊस व अतिवृष्टीने (Heavy Rain) शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. असे असतानाही नजरअंदाज पैसेवारीत शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला नाही. वणी (Vani) तालुक्यातील केवळ १५ गावांची पैसेवारी ५०च्या आत आहे. जिल्ह्यात ओला दुष्काळ (Wet Drought) असताना जिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी ५३ प्रशासनाने प्रसिद्ध केली. प्रशासनाच्या लेखी पीकपरिस्थिती चांगली असली, तरी वस्तुस्थिती वेगळीच आहे.
गेल्या जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्यांत पावसाने शेतपिकांचे नुकसान केले. जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांत पावसाने अक्षरक्ष: धुमाकूळ घातला. संततधार पावसाने चार लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. अनेक तालुक्यांतील शेतजमिनी खरडून गेल्या. वणी, मारेगाव, राळेगाव, बाभूळगाव या तालुक्यांतील शेतजमिनी व गावे काही दिवस पाण्याखाली होती. दुसरीकडे नजरअंदाज आणेवारी पीकस्थिती चांगली असल्याचे दिसत आहे. जिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी ५३ आली आहे. गेल्या वर्षी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. आर्थिक नुकसानीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा निधी अजूनही आलेला नाही. यंदाही गेल्या वर्षीपेक्षाही बिकटस्थिती आहे. असे असतानाही नरजअंदाज पैसेवारी ५३ जाहीर करण्यात आली आहे. पीकस्थिती उत्तम असल्याचे प्रशासनाच्या लेखी दिसत आहे. सुधारित पैसेवारीत शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना मदतीसाठी अंतिम पैसेवारी महत्त्वाची आहे. जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये पावसाने पिकांना फटका बसला. पीक काढणीच्या वेळी परतीच्या पावसाने आगमन होण्याची शक्यता आहे. अतिपावसाने कापूस, सोयाबीन व तूर या पिकांच्या उत्पादनात घट झाली. कपाशीला फटका बसला आहे. परिणामी, शेतकऱ्यांची एकरी उत्पादनात घट झाली. अशातच जिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी ५३ आली आहे. यावेळी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात दोन हजार १५९ गावे आहेत. त्यात लागवडीसाठी योग्य असलेल्या गावांची संख्या दोन हजार ४६ एवढी आहे. या सर्व गावांची पैसेवारी जाहीर झाली आहे. वणी तालुक्यातील १५ गावेवगळता इतर तालुक्यांतील पैसेवारी ५३ निघाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आता सुधारित पैसेवारीकडे लागल्या आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.