Paddy Nursery : भाताच्या सहा हजार हेक्टरवर रोपवाटिका

Kharif Paddy Plantation : भातपट्ट्यात होत असलेल्या अधूनमधून पावसामुळे भात उत्पादकांमध्ये अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भात रोपवाटिका टाकल्या आहेत.
Paddy
PaddyAgrowon
Published on
Updated on

Pune News : भातपट्ट्यात होत असलेल्या अधूनमधून पावसामुळे भात उत्पादकांमध्ये अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भात रोपवाटिका टाकल्या आहेत. आत्तापर्यंत पाच हजार ९९२ हेक्टरवर रोपवाटिका तयार झाल्या आहेत. मागील आठ दिवसांपासून भात पट्ट्यात कमीअधिक पाऊस होत असल्याने वेळेवर लागवडी होण्याची चिन्हे तयार झाली आहेत.

यंदा हवामान विभागाने ९७ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केल्यानंतर भात उत्पादकांनी खरिपाची तयारी केली होती. त्यातच गेल्या पंधरा दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होऊन काही ठिकाणी पाऊस पडत आहे.

खरीप हंगाम अडचणीत येत असताना २३ जूनपासून पावसाने सुरुवात केली आहे. रोपवाटिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. रोपवाटिका टाकल्यानंतर साधारणपणे २० ते २५ दिवसांत रोपे लागवडीसाठी येतात.

Paddy
Paddy farming : इगतपुरीत पावसामुळे भात शेतीच्या कामांना गती

जिल्ह्यात जूनमध्ये सरासरीच्या १७६.२ मिलिमीटरपैकी ९०.८ मिलिमीटर म्हणजेच ५१ टक्के पाऊस पडला. तर ६ जुलैपर्यंत ४३.३ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी लागवडीसाठी भात रोपवाटिका टाकल्या आहेत. जिल्ह्यात भाताचे सरासरी ५९ हजार ६२७ हेक्टर क्षेत्र आहे.

Paddy
Paddy Farming : पावसाअभावी भात रोपांची वाढ खुंटली

गेल्या वर्षी जूनमध्ये भातपट्ट्यात चांगला पाऊस झाल्यामुळे सुमारे सहा हजार हेक्टरच्या आसपास भात रोपवाटिका झाल्या होत्या. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पाऊस पडल्यामुळे वेळेवर भात लागवडी झाल्या. यंदा जिल्ह्यात सुमारे ६० हजार हेक्टरहून अधिक भात लागवडी होण्याचा अंदाज असल्याने मोठ्या प्रमाणात भात रोपवाटिका शेतकऱ्यांनी टाकल्या आहेत.

भात रोपवाटिकेचे तालुकानिहाय क्षेत्र (हेक्टरमध्ये)

तालुका --- भात लागवडीचे क्षेत्र---रोपवाटिकेचे क्षेत्र

भोर -- ७३८३ -- १०२०

वेल्हे -- ५०१८ -- ५१२

मुळशी -- ७६६९ -- ७६०

मावळ -- १२१२५ -- १२१०

हवेली -- २०६४ -- १९०

खेड -- ७२८६ -- ६४०

आंबेगाव -- ५२८२ -- ५४५

जुन्नर -- ११६२९ -- १०२०

पुरंदर -- १२०८ -- ९५

दौंड -- ३ -- ०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com