Paddy Farming : शिरगावात ७० गुंठ्यांवरील भात रोपे तरारली

Kharif Season : पाण्याची उपलब्धता, वेळेत नियोजन आणि योग्य व्यवस्थापन या जोरावर त्यांनी १२० दिवसांतील कमी कालावधीतील ‘रत्नागिरी १’ या भात बियाण्यांची भात लागवड यशस्वी करून दाखवली आहे.
Paddy
Paddy Agrowon
Published on
Updated on

Ratnagiri News : मॉन्सून लांबल्यामुळे यंदा भातशेतीचे वेळापत्रक कोलमडलेले असतानाच रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव येथील शेतकरी डॉ. मिलिंद यशवंत खेर यांच्या शेतामध्ये हळव्या भाताची रोपे तरारली असून त्यांना लोंब्या आल्या आहेत.

पाण्याची उपलब्धता, वेळेत नियोजन आणि योग्य व्यवस्थापन या जोरावर त्यांनी १२० दिवसांतील कमी कालावधीतील ‘रत्नागिरी १’ या भात बियाण्यांची भात लागवड यशस्वी करून दाखवली आहे. त्यांच्या नियोजनाचे जिल्हा कृषी विभागाकडूनही कौतुक होत आहे.

Paddy
Paddy Variety : ‘रत्नागिरी-८’ वाणाची विक्रमी ८० टन विक्री

यंदा मॉन्सून उशिराने दाखल झाला होता. पावसाची वाट न पाहताच शिरगाव येथील डॉ. खेर यांनी पेरण्या दरवर्षीप्रमाणेच १३ जूनला आटपून घेतल्या. याच कालवधीत पावसाने दडी मारली होती. शेतामधील विहिरीवर पंप असल्यामुळे त्याचे पाणी पेरलेल्या शिवाराला वापरले जात होते. त्यामुळे उन्हाचा तडाखा जाणवला नाही. फुटवेही व्यवस्थित आल्यामुळे ७० गुंठ्याला आवश्यक तेवढी रोपे तयार झाली.

३ जुलैला त्यांनी भात लावणीची कामे सुरू केली. साधारपणे ६ जुलैपर्यंत लावण्याही आटोपल्या. दोन महिन्यात त्यांच्या शेतामधील भात रोपांना लोंब्या आल्या आहेत. कोकण कृषी विद्यापिठाअंतर्गत असलेल्या शिरगाव भात संशोधन केंद्राने तयार केलेल्या ‘रत्नागिरी १’ हे हळव्या जातीचे म्हणजेच ११० दिवसांत उत्पादन देणारे बियाणे शेतात वापरले आहे. दोन महिन्यांत भात पसवले आहे.

पावसाची अनियमितता असली तरीही आवश्यक तेव्हा पंपाद्वारे रोपांना पाणी दिले जाते. सेंद्रिय आणि रासायनिक अशा दोन्ही खतांचा योग्य प्रमाणात ते वापर करत आले आहेत. लावणीच्या सुरुवातीला शेणखत टाकले जाते.

Paddy
Paddy Farming : हंगामी भातशेती बहरली

त्यानंतर युरिया आणि सुफला या दोन्हीचा योग्य प्रमाणात डोस रोपांना दिला जातो. पावसाने ओढ दिली असली तरीही पाणी पुरेसे असल्यामुळे किड, रोगांचा प्रादुर्भाव जाणवलेला नाही. पेरणीपासून आतापर्यंत ७५ दिवस झाले असून अजून ३५ दिवसांनी भात कापणीयोग्य होईल. दरवर्षी ते याच कालावधीत कापण्या आटपून घेतात.

दरवर्षीप्रमाणेच यंदाही भातशेतीची वेळापत्रक आम्ही पाळले आहेत. एकूण ७० गुंठे जमिनीत भात लागवड केली आहे. हळव्या जातीच्या बियाणे वापरण्यात आले आहे. सप्टेंबरच्या अखेरीस भात कापणीयोग्य होईल.
- डॉ. मिलिंद खेर
डॉ. खेर यांनी उपलब्ध सुविधांचा योग्य पद्धतीने वापर केला आहे. योग्य व्यवस्थापनामुळे त्यांच्या शेतामधील रोपांना लोंब्या लागल्या आहेत.
- सुनंदा कुऱ्हाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com