
Paddy Cultivation Roha News रोहा, जि. रायगड : तालुक्यातील डोलवहाल बंधारा उजवा तिरातून शेतीसाठी (Paddy Farming) आवश्यक पाणीपुरवठा (Water Supply) कालव्याद्वारे केला जात आहे. या पाण्यामुळे खांब विभागात लागवड (Paddy Cultivation) करत असलेल्या उन्हाळी हंगामातील भातशेतीच्या कामास दमदार सुरुवात झाली आहे.
डोलवहाल बंधाऱ्यातून रोहा व माणगाव तालुक्यात भातशेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो. ज्या शेतकऱ्यांनी पाण्याची मागणी केली, त्यांना कालव्याद्वारे पाणी उपलब्ध केले जात असल्याने भातलागवडीला सुरुवात झाली आहे.
चालू उन्हाळी हंगामातही शेतीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध झाल्याने बि-बियाण्यांची लागवड केली जात आहे. भात लागवडीसाठी रोपेही योग्य कालावधीत तयार झाल्याने सद्यस्थितीत कामाला वेग आला आहे.
४० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या कालव्याची डागडुजी व दुरुस्तीसाठी तीन वर्षांपूर्वी शेतीसाठीचे आवश्यक पाणी बंद करण्यात आले होते. दुरुस्तीनंतर ते पुन्हा सुरू करण्यात आले.
मधल्या कालावधीत भातशेती ओसाड व वाया जाऊ नये, यासाठी कडधान्यांची लागवड करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर काही भागातील शेतकऱ्यांना कडधान्य पीक घेणे सोईस्कर वाटल्याने त्यांनी कालव्याचे पाणी घ्यायचे बंद केले.
कृष्णकांत पवार प्रथम
तळा : तालुका कृषी विभागाच्या वतीने घेतलेल्या भातपीक स्पर्धेचे बक्षीस पिटसई कोंड येथील शेतकरी कृष्णकांत पवार यांना जाहीर झाला आहे.
अतिशय मेहनत घेऊन त्यांनी शेतात भातपीक घेऊन स्पर्धेत भाग घेतला. याच मेहनतीवर त्यांनी तालुक्यातील भातपीक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
महागाई तरी भातशेती
सद्यःस्थितीत वाढती महागाई, बि-बियाणे व खते यांचे वाढते दर, मजुरांची वाढती मजुरी, टॅक्टर व पॉवर ट्रेलरचे वाढते दर पाहता भातशेती करणे अवघड झाले आहे.
वडिलोपार्जित व्यवसाय व भातशेती वाया जाऊ नये; तसेच हक्काचा व्यवसाय म्हणून भातशेतीचे पीक घेतले जात असल्याचे शेतकरी वर्गाचे म्हणणे आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.