Oshiwara River : ओशिवरा वालभाट नदीला नवसंजीवनी मिळणार

या कामांसाठीच्या निविदा तयार करण्यात आल्या असून आयुक्तांकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. नदीच्या पुनरुज्जीवनासाठी एकूण ७७५ कोटी रुपयांचा खर्च केले जातील.
Oshiwara River
Oshiwara RiverAgrowon

मुंबई : ओशिवरा वालभाट नदीच्या (Oshiwara Walbhat River) दोन्ही बाजूंना सर्व्हिस रोड बनवून मुंबई महापालिका (BMC) नदीचे पुनरुज्जीवन करणार आहे. नदीत जाणारे सांडपाणी अडवण्यासाठी मलनिस्सारण केंद्र उभारणार आहे.

या कामासाठी पालिका ९७५ कोटी रुपये खर्च करणार असून याबाबतचा प्रस्ताव आयुक्त इक्बाल सिंग चहल (Commissioner Iqbal Singh Chahal) यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.

ओशिवरा वालभाट नदीतील मलनिस्सारणाचे घाण पाणी रोखण्यासाठी पाच मलनिस्सारण केंद्रे उभारणे, डिझाइन, बिल्ड, क्लीन, ऑटोमॅटिक पॅकेज, मॉड्युलर, अत्याधुनिक मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र, १५ वर्षे देखभाल करणे, सीवरेज पाईपलाईन टाकणे आणि तिची दिशा बदलणे, नदीच्या दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड बांधणे आणि सर्व्हिस रोडला लागून स्टॉर्म वॉटर ड्रेनेज लाईन टाकणे ही कामे केली जाणार आहेत.

या कामांसाठीच्या निविदा तयार करण्यात आल्या असून आयुक्तांकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. नदीच्या पुनरुज्जीवनासाठी एकूण ७७५ कोटी रुपयांचा खर्च केले जातील.

Oshiwara River
River Conservation Summit : पुण्यात नदी संवर्धनावर दोनदिवसीय परिषद

वर्षभरात पुनरुज्जीवन

नदी स्वच्छ करून तिला नैसर्गिक स्वरूप प्राप्त करून देण्याचे काम पालिका लवकरच सुरू करणार आहे. वालभट-ओशिवरा (२९.२५ एमएलडी) दहिसर नदी (१६.५० एमएलडी), पोयसर नदीमध्ये (६०.७० एमएलडी) दररोज सोडले जाणारे सांडपाणी रोखण्यासाठी नद्यांचे वर्षभरात पुनरुज्जीवन केले जाणार आहे. यावर ४ कोटी २१ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com