Monsoon Session 2023 : अजित दादा आले धनंजय मुंडे यांच्या मदतीला, शेती प्रश्नांवर विरोधकांनी विधानसभा गाजवली

Ajit Pawar : केंद्र सरकारकडून खताच्या किंमती मर्यादित रहाव्यात यासाठी १ लाख ३० हजार कोटी रुपयांची सबसिडी दिल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.
Maharashtra Political News
Maharashtra Political Newsagrowon
Published on
Updated on

Maharashtra Political News : मागच्या दोन दिवसांपासून राज्याचे पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. दरम्या राज्यात बोगस बियाण्यामध्ये वाढ झाल्याने शेतकऱ्यांची मोठी फसवणूक होत असल्याच्या मुद्दयावरून तसेच खतांच्या वाढत्या किंमतींवरून विरोधकांनी सरकारवर टीका केली.

यावरून विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात जोरदार गोंधळ उडाल्याचे पहायला मिळाले. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना उत्तर देत केंद्र सरकारकडून खताच्या किमती मर्यादित रहाव्यात यासाठी १ लाख ३० हजार कोटी रुपयांची सबसिडी दिल्याची माहिती दिली.

दरम्यान विरोधक नेते विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात यांनी कृषी मंत्र्याना शेती मुद्दांवरून प्रश्नांची सरबत्ती केली यावरून धनंजय मुंडे यांचा गोंधळ उडताच अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली.

यावर ते पुढे म्हणाले की, कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना बोगस बियाणे व खते विक्री संदर्भात कारवाई सुरू केली आहे. १६४ मेट्रीक टन साठा बियाणांचा जप्त केला आहे. २२ पोलीस केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. २० विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आल्याचीही त्यांनी माहिती दिली.

Maharashtra Political News
Ajit Pawar : मनधरणीसाठी बंडखोर आमदार पुन्हा शरद पवारांच्या भेटीला...

१०५ विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आलेत तर खतांसंदर्भात गुणनियंत्रण विभागाने १९० टन साठा जप्त केला आहे. त्यासंदर्भात १३ पोलीस केसेस दाखल करून ५२ विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. याशिवाय मागील कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कृषीमंत्री, महसूलमंत्री, ग्रामविकासमंत्री, पाणीपुरवठामंत्री अशी एक समिती करण्यात आली आहे.

मात्र कारवाईचे मागील कायदे लक्षात घेता बोगस खते व बियाणे विक्री करणार्‍यांवर कठोरात कठोर कारवाई केली जात नव्हती त्याकरीताच ही समिती करण्यात आली आहे. याचबरोबर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितल्याप्रमाणे अधिवेशन संपायच्या आत कडक कायदा आणला जाईल व बोगस खते व बियाणे विकणार्‍यांवर नियंत्रण आणण्याचे काम राज्यसरकार करत आहे असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com