Crop Insurance
Crop Insurance Agrowon

Crop Insurance : सर्व्हर डाऊन, ऑपरेटरच्या चुकांमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

Parbhani Crop Insurance : पंतप्रधान खरिप पीकविमा योजनेअंतर्गत सहभागासाठी सोमवार (ता. ३१) पर्यंतची अंतिम मुदत आहे.
Published on

Parbhani News : पंतप्रधान खरिप पीकविमा योजनेअंतर्गत सहभागासाठी सोमवार (ता. ३१) पर्यंतची अंतिम मुदत आहे. त्यामुळे शेतकरी विमा अर्ज दाखल करण्यासाठी जनसुविधा केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल करत आहेत.

परंतु दिवसभर सर्व्हरवर डाऊनमुळे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी वेळ लागत आहे. त्यामुळे मध्यरात्रीनंतर अर्ज भरावे लागत आहे. संगणक ऑपरेटरकडून गडबडीत अर्ज भरले जात आहेत.

Crop Insurance
Crop Insurance : पीकविमा भरताना शेतकऱ्यांची तारांबळ

परिणामी विमा संरक्षित क्षेत्र, शेतकरी खातेदारांची नावे, बँक खात्याचा तपशील यामध्ये चुका होत आहेत. त्या दुरुस्त करण्याचा पर्याय नाही. त्यामुळे शेतकरी पीकविम्याच्या लाभापासून वंचित राहू शकतात.

जनसुविधा केंद्र चालक प्रत्येक पीकविमा अर्जासाठी ५० ते १०० रुपये उकळण्याचे गैरप्रकार सुरुच आहे. त्याकडे सर्व संबंधितांचे दुर्लक्ष्य होत असल्याने १ रुपयात पीकविमा ही संकल्पना केवळ नावालाच असल्याची स्थिती आहे.

Crop Insurance
Crop Insurance : पीकविमा नोंदणीला मुदतवाढ अशक्य

शनिवार (ता. २९) पर्यंत परभणी व हिंगोली जिल्ह्यात एकूण ११ लाख ८३ हजार ९८८ शेतकऱ्यांनी पीकविम्याचे ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत. या दोन जिल्ह्यात गतवर्षी च्या तुलनेत यंदा १ लाख २३ हजार ६७४ पीकविमा अर्ज जास्त आले आहेत. जनसुविधा केंद्र, बँका तसेच पीकविमा पोर्टलवर वैयक्तिकरीत्या असे पीकविमा अर्ज भरण्याचे पर्याय आहेत.

परंतु जनसुविधा केंद्रावर (सीएससी) केंद्राचा पर्यायाला शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती आहे. खंडीत वीजपुरवठ्यामुळे ग्रामीण भागात अर्ज भरण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यात गेल्या आठवड्यापासून पोर्टलचे सर्व्हर डाऊन होत असल्यामुळे दिवसभर अर्ज दाखल करता येत नाहीत. त्यामुळे शेतकरी जनसुविधा केंद्र चालकाकडे कागदपत्रासह अर्ज देऊन जात आहेत. रात्री उशिरा सर्व्हर सुरळीत चालत आहे. परंतु आलेल्या अर्जाचा निपटारा करण्याच्या घाईत चुका होत आहेत.

जनसुविधा केंद्रावर शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल केले जात आहेत. परंतु तेथील ऑपरेटरकडून ऑनलाइन माहिती भरताना विमा संरक्षित क्षेत्र, खातेदार शेतकऱ्यांच्या नावात चुका होत आहेत. त्या दुरुस्त करण्यासाठी पर्याय नाही. चुकांमुळे पीकविमा योजनेच्या लाभापासून शेतकरी वंचित राहू शकतात.
नरेश शिंदे, सनपुरी, जि.परभणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com