Agriculture Inputs : ऑनलाइन कृषी निविष्ठा विक्री परवाने मिळणे बंद

Agriculture Department : कृषी विभागामार्फत बियाणे, खते, कीटकनाशके विक्रीसाठी परवाने प्रदान करण्यात येतात. यासाठी ‘आपले सरकार’ महाऑनलाईन पोर्टलवरुन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
Agriculture Inputs
Agriculture Inputs Agrowon
Published on
Updated on

Nanded News : कृषी विभागामार्फत बियाणे, खते, कीटकनाशके विक्रीसाठी परवाने प्रदान करण्यात येतात. यासाठी ‘आपले सरकार’ महाऑनलाईन पोर्टलवरुन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

परंतु या पोर्टलवर मागील दोन महिन्यांपासून कृषी विभागातील संबंधित अधिकाऱ्याची डिजिटल स्वाक्षरी स्वीकारली जात नसल्याने नवीन परवान्यासह नूतनीकरणाचे काम ठप्प पडले आहे.

राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेते कृषी विभागामार्फत बियाणे, खते, कीटकनाशके विक्रीकरिता परवान्यासाठी तसेच परवाना नूतनीकरणासाठी महाऑनलाईन पोर्टलवरुन अर्ज करतात. त्यानंतर विहित मुदतीत त्यांना परवाना दिला जातो.

ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन आहे. यामुळे कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा वेळ तसेच खर्चाची बचत होते. परवाने वितरणात अतिशय चांगली कार्यवाही होत असल्याने याबाबत समाधान व्यक्त करण्यात येते होते. परंतु मागील दोन महिन्यांपासून या प्रक्रियेला खीळ बसली आहे.

Agriculture Inputs
Agriculture Inputs : अनधिकृत निविष्ठा विक्रेत्यांवर होणार फौजदारी

राज्यातून नवीन परवान्यांसाठी आलेल्या मंजूर अर्जांवर संबंधित अधिकाऱ्याची डिजिटल स्वाक्षरी स्वीकारली जात नाही. त्यामुळे तब्बल साडेनऊ हजार परवान्यांचे वितरण रखडले आहे. परिणामी परवान्यांअभावी व्यवहार ठप्प झाले आहेत. यासोबतच ई-पॉस मशिन लिंकिंग करता येत नसल्याच्या विक्रेत्यांच्या तक्रारी आहेत.

या प्रक्रियेला ‘ब्रेक’ लागल्याने जिल्हास्तरावर परवानाधारक निविष्ठा विक्रेत्यांची यादीही उपलब्ध होत नाही. तसेच परवानाधारक कृषी निविष्ठा विक्रेत्यांना त्यांच्या लॉगिनवर नूतनीकरणाचे पर्याय दिसत नाहीत. यामुळे नूतनीकरणासाठी अर्ज करता येत नसल्याचे मत विक्रेत्यांनी व्यक्त केले.

Agriculture Inputs
Agriculture Inputs : अनधिकृत निविष्ठा विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

थोडक्यात महत्त्वाचे...

- परवाना प्रक्रियेला दोन महिन्यांपासून खीळ

- तब्बल साडेनऊ हजार परवाने वितरण रखडले

- परवान्यांअभावी व्यवहार ठप्प

- ई-पॉस मशिन लिंकिंगबाबतही विक्रेत्यांच्या तक्रारी

- परवाने नूतनीकरणासाठीही अर्ज करता येईना

नांदेड जिल्ह्यातील २३० परवाने रखडले

राज्यात नांदेड जिल्ह्यात सर्व प्रथम कृषी निविष्ठा विक्रेत्यांना ऑनलाइन परवाने वितरित करण्यात आले होते. यानंतर नांदेडला परवाने वितरित करण्याची प्रक्रिया जलद गतीने झाली.

जिल्ह्यातून सध्या कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी नवीन परवान्यांसाठी ऑनलाइन पोर्टलवरुन २३० अर्ज दाखल केले आहेत. परंतु वरिष्ठ स्तरावर अधिकाऱ्यांची डिजिटल स्वाक्षरी स्वीकारली जात नसल्यामुळे परवाना वितरण रखडल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com