
Onion Crop :ळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे लागवडयोग्य होत आली आहेत. लवकरच किंवा या महिन्यात अनेक शेतकरी लागवड करतील. यंदा रोपांचे दर किंचित कमी आहेत. रोपवाटिकांना अनुकूल स्थिती किंवा कमी पाऊस राहिल्याने रोपांची वाढ ही चांगली झाली आहे.
कांदा बियाण्याचे दर अव्वाच्या सव्वा असल्याने रोपवाटिकांमध्ये रोपांचे दरही फारसे कमी झालेले नाहीत. गेल्या वर्षी सदोष बियाणे, प्रतिकूल वातावरण यामुळे अनेक कांदा रोपवाटिकांचे नुकसान झाले होते. हे नुकसान यंदा कमी आहे. अपवाद वगळता रोपवाटिका बऱ्यापैकी बहरल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी अडीच फूट रुंद आणि १५० फूट लांब सरीतील कांदा रोपे आठ ते नऊ हजार रुपयांत शेतकऱ्यांना उपलब्ध होत होती. यंदा मात्र दर तेजीत नाहीत. खानदेशात धुळ्यातील धुळे, साक्री, शिंदखेडा, जळगावमधील चोपडा, यावल, धरणगाव, एरंडोल भागात अनेक शेतकरी व्यावसायिक रोपवाटिका तयार करतात. यंदा रोपवाटिका अधिक आहेत. सुमारे ३०० हेक्टरवर रोपवाटिका आहेत.
धुळे, नंदुरबारात रोपवाटिका वाढल्या आहेत. कांदा लागवडीचे नियोजन अनेक शेतकरी करीत आहेत. यामुळे कांदा रोपांचे दर फारसे कमी नाहीत. यंदा अडीच फूट बाय १५० फूट लांब सरीमधील कांदा रोपे साडेसहा ते सात हजार रुपयात उपलब्ध होत आहेत. रोपवाटिका जोमात असल्या तरीदेखील रोपांचे दर फारसे कमी नसल्याने शेतकऱ्यांना वित्तीय भार सोसावा लागणार आहे. कांदा बियाणे यंदा अव्वाच्या सव्वा दरात शेतकऱ्यांना देण्यात आले. किमान १००० व कमाल २००० रुपये प्रतिकिलो, असे दर बाजारात कांदा बियाण्याचे होते. यामुळे कांदा रोपांचे दरही फारसे कमी नाहीत. कांदा लागवड जळगाव, धुळ्यातच अधिक केली जाते.
अनेक शेतकऱ्यांनी आपापल्या रोपवाटिका तयार केल्या आहेत. यामुळे व्यावसायिक रोपवाटिकांकडे जाण्याची गरज फारशा शेतकऱ्यांना नसणार आहे. जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, एरंडोल, धरणगाव भागांत अनेक शेतकऱ्यांच्या रोपवाटिका आहेत. त्यातील रोपांची वाढ जोमात होत आहे. लागवड ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात केली जाईल, अशी स्थिती आहे. मध्यंतरी अतिउष्णतेत काही रोपांचे नुकसान झाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.