Onion Market : नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या संयमाचा उद्रेक; अनेक ठिकाणी लिलाव बंद

Onion Auction : चालू वर्षी उन्हाळी कांद्याला दर नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत होते. अशातच ऑगस्ट महिन्यात दरात सुधारणा होताच केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाचे कांद्यावर ४० टक्के निर्यातशुल्क तात्काळ लागू केले
Onion Market
Onion MarketAgrowon

Nashik Onion News : चालू वर्षी उन्हाळी कांद्याला दर नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत होते. अशातच ऑगस्ट महिन्यात दरात सुधारणा होताच केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाचे कांद्यावर ४० टक्के निर्यातशुल्क तात्काळ लागू केले. त्यामुळे निर्यात प्रक्रिया अडचणीत सापडल्याने व्यापाऱ्यांनी लिलाव बंदची हाक दिली.त्यांनतर २३ ऑगस्टपर्यंत ३ दिवस कामकाज ठप्प झाले. दरम्यान कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी मात्र केंद्र सरकारने २,४१० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे २ लाख क्विंटल कांदा खरेदी करण्याची घोषणा केली.

मात्र ही खरेदी करणारे 'नाफेड' व 'एनसीसीएफ' या दोन्ही यंत्रणा बाजार समित्यांमध्ये खुल्या बाजारात खरेदीसाठी याव्या, अशी मागणी शेतकरी व शेतकरी संघटनानी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत केली होती. मात्र गुरुवार(ता. २४) रोजी लिलाव झाल्यानंतर खरेदीसाठी व्यापारी होते, मात्र केंद्राकडून कुणीही नव्हते. त्यातच सरासरी दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक होत जिल्ह्यात विविध ठिकाणी लिलाव बंद पडले.

Onion Market
Valley Of Flowers : कास पठार बहरले, उधळू लागले रंग

उन्हाळी कांदा दरामध्ये गेली तीन महिने कुठलीही सुधारणा नव्हती; मात्र ऑगस्ट महिन्यात पहिल्या सप्ताहात दरात सुधारणा दिसून आली. अशातच ग्राहक हित लक्षात घेता केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाने भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत खरेदी केलेला कांदा खुल्या बाजारात आणला. नंतरच्या टप्प्यात ४० टक्के निर्यातशुल्क लादले. शेतकरी शेतकरी संघटना व व्यापाऱ्यांमध्ये असंतोषाचा भडका उडाला. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनाही दिलासा देण्याचा दावा केंद्र सरकारने केला.

त्यावर पुन्हा भाव स्थिरीकरण निधी योजनेंतर्गत २ लाख क्विंटल कांदा खरेदी २,४१० रूपये क्विंटलप्रमाणे करण्याची घोषणा केली. त्यासाठी ही खरेदी जिल्ह्यातील बाजार समिती व उपबाजार आवारामध्ये करण्यात यावी अशी शेतकरी वर्गातून मागणी होती मात्र असे असताना नियमित लिलाव सुरू झाल्यानंतरच पहिल्या सत्रात जिल्हाच्या अनेक ठिकाणी नाफेड व एनसीसीएफचे खरीदार नव्हते त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याची चौकशी केली त्यातच व्यापारी बोली लावू लागतात दरात घसरण दिसून आली त्यामुळे संताप झालेल्या शेतकऱ्यांनी आक्रमक होत जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत लासलगाव येवला कळवण अशा ठिकाणी पहिल्या सत्रात लिलाव बंद पाडले होते.

याबाबत माहिती देताना कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्री डॉ.भारती पवार, नाफेडचे व्यवस्थापकीय संचालक, रितेश चौव्हाण यांनी सर्व बाजार समित्यांमध्ये नाफेडची कांदा खरेदी २,४१० रुपये क्विंटल दराने होईल असा शब्द दिला.

मात्र जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये नाफेडच्या कांदा खरेदीसाठी खरेदीदार उतरले नाहीत. व्यापाऱ्यांनी लिलावात कांदा १५०० ते १७०० रुपये प्रतिक्विंटलने खरेदी करण्यास सुरुवात केल्यानंतर शेतकऱ्यांनी बंद पडले आहेत. शेतकऱ्यांचा संताप सरकारला महागात पडेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com