Banana Cultivation : रावेरातही कांदेबाग केळी लागवड वाढू लागली

खानदेशात जळगाव जिल्ह्यातील चोपडा, भडगाव-पाचोरा, जळगाव, धुळ्यातील शिरपूर हा भाग कांदेबाग केळीसाठी प्रसिद्ध आहे.
Onion And Banana Cultivation
Onion And Banana CultivationAgrowon
Published on
Updated on

जळगाव ः  खानदेशात जळगाव जिल्ह्यातील चोपडा, भडगाव-पाचोरा, जळगाव, धुळ्यातील शिरपूर हा भाग कांदेबाग केळीसाठी प्रसिद्ध आहे. पण आता रावेर, मुक्ताईनगर या मृगबहर किंवा नवती केळी बागांच्या लागवडीत ( Banana Cultivation) अग्रेसर असलेल्या भागातही कांदेबाग केळीची लागवड सुरू झाली आहे.

रावेरात बारमाही केळी लागवड केली जाते. यंदा ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये लागवडीच्या कांदेबाग केळीलाही अनेक शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. या केळीखालील क्षेत्र रावेर, मुक्ताईनगर भागात यंदा सुमारे ३०० ते ३५० हेक्टरवर जाऊ शकते. रावेरात जून, जुलैमध्ये मृगबहर केळी लागवड केली जाते. अनेक शेतकरी मार्चपासून लागवड सुरू करतात. मार्च ते जुलै या दरम्यान रावेर, मुक्ताईनगरात केळी लागवड केली जाते. या भागात केळी रोपांच्या लागवडीला शेतकरी पसंती देत आहेत.

Onion And Banana Cultivation
Crop Damage Compensation : मिळालेली भरपाईची मदत ‘ना थरीची, ना भरीची’

जळगाव, चोपडा, भडगाव-पाचोरा या भागात केळी कंद लागवडीवर अनेक शेतकरी भर द्यायचे. पण यंदा रोपे लागवडीकडेदेखील चोपडा, जळगावमधील शेतकरी वळले आहेत. त्याबाबत अनेक शास्त्रज्ञ जनजागृती, लाभ कसे मिळतात याबाबत माहिती देत आहेत. खानदेशात यंदा सुमारे १२ ते १३ हजार हेक्टरवर कांदेबाग केळीची लागवड केली जाईल.

ही लागवड सुरूच आहे. मध्यंतरी अतिपावसामुळे ही लागवड रखडली होती. ऑक्टोबरअखेरिस लागवड पूर्ण करण्याकडे अनेकांचा भर असतो. पण यंदा वाफसाच नसल्याने पूर्वमशागत, लागवड याबाबतची कार्यवाही रखडली. सध्या लागवडीला वेग आला आहे. पुढील १० ते १२ दिवसात लागवड पूर्ण होईल. आता दर्जेदार कांदेबाग केळीची आखाती देशांत निर्यातीसाठीदेखील मागणी वाढू लागली आहे. यामुळे रावेर व इतर भागातही कांदेबाग केळीची लागवड वाढत असल्याचे चित्र आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com