अॅग्रोवन वृत्तसेवा
Hingoli Agriculture News : यंदा खरीप हंगामात हिंगोली जिल्ह्यात सोयाबीन ग्रामबीजोत्पादनाचे (Soybean Village Seed Production ) २ लाख ५१ हजार ७५० हेक्टर क्षेत्रावर नियोजन आहे.
प्रतिहेक्टरी १० क्विंटलनुसार २ लाख ५१ हजार ७५० क्विंटल बियाणे उत्पादनाचा इष्टांक आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
हिंगोली जिल्ह्यात गतवर्षी (२०२२) सोयाबीनची २ लाख ५७ हजार ४२५ हेक्टरवर पेरणी झाली होती. जिल्ह्यात २०२० ते २०२२ या तीन वर्षांत सोयाबीनची बियाण्याची सरासरी ६२ हजार ६४३ क्विंटल विक्री झाली.
यंदा (२०२३) मध्ये २ लाख ५५ हजार हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे.प्रस्तावित क्षेत्रानुसार १ लाख ९१ हजार २५० क्विंटल बियाण्याची गरज आहे. प्रस्तावित बियाणे बदलाचे प्रमाण ३५ टक्केनुसार ६६ हजार ९३७ क्विंटल बियाण्याची गरज आहे.
गतवर्षी (२०२२) खरीप हंगामात हिंगोली जिल्ह्यात ३४ हजार ४९२ शेतकऱ्यांच्या ६७ हजार ८४२ हेक्टरवर सोयाबीन ग्रामबीजोत्पादन कार्यक्रम घेण्यात आला. त्यापासून २ लाख ४१ हजार ७५० क्विंटल बियाणे उत्पादन मिळाले. उर्वरित ६६ हजार ९३७ क्विंटल बियाण्यासाठी सार्वजनिक आणि खासगी बियाणे उत्पादक कंपन्यांकडे मागणी करण्यात आली आहे.
त्यात महाबीजकडे १ हजार ९४४ क्विंटल, राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडे १ हजार २०० क्विंटल, खासगी कंपन्यांकडे ६३ हजार ७९३ क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली आहे.
यंदाच्या खरीप हंगामात कमी कालावधीत येणारे सोयाबीनच्या एमएयूएस ६१२, एमएयूएस १५८, एमएयूएस ७१, फुले अग्रणी, फुले दुर्वा, जेएस ३३५, एमएसीएस ११८८ या वाणांच्या बियाण्याचा ‘महाबीज’कडून जास्तीचा पुरवठा अपेक्षित आहे, असे सूत्रांनी सांगितले.
सोयाबीन ग्रामबीजोत्पादन नियोजित क्षेत्र (हेक्टरमध्ये)
तालुका...नियोजित क्षेत्र
हिंगोली...६२०००
कळमनुरी...५६०००
वसमत...३६०००
औंढानागनाथ...३५३५०
सेनगाव...६२५००
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.