
Amalner News : ‘लक्ष्मी’ योजनेतून आता प्रत्येकाच्या ‘सातबारा’वर घरातील महिलेचे नाव लावून तिला तिच्या हक्काची जाणीव करून दिली जाईल, अशी माहिती नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी महसूल सप्ताहानिमित्त लाभार्थ्यांना जागेवर लाभ वितरण कार्यक्रमात बोलताना दिली. ग. स. हायस्कूलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या वेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, परीविक्षाधिन जिल्हाधिकारी अर्पित चव्हाण, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, चोपड्याचे उपविभागीय अधिकारी एकनाथ भंगाळे, अमळनेर तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, चोपडा तहसीलदार थोरात उपस्थित होते.
शेतकरी अथवा नागरिकांना विविध सात प्रकारच्या नोंदी करण्यासाठी आता तहसील अथवा तलाठी कार्यालयात चकरा मारायची गरज नसून ई हक्क प्रणालीतून ते घरबसल्या किंवा सेतू, संग्राम, आपले सरकार केंद्रावरून अर्ज करू शकतात, अशीही माहिती आयुक्त गमे यांनी दिली.
‘पेन्शन आपल्या दारी’ योजना राबविणारा जळगाव जिल्हा राज्यातील पहिला जिल्हा असल्याचे देखील त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी प्रास्ताविकातून अमळनेर विभागाचा आढावा मांडला.
या वेळी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला ‘उभारी’ योजनेंतर्गत माधुरी मैराळे या महिलेस धनादेश व विविध लाभ वाटप करण्यात आले. महिलेच्या मुलांना दहावीपर्यंत मोफत शिक्षण देणाऱ्या संचालक भटू पाटील यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास संतोष बावणे,शांत सरोदे, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, मंडळाधिकारी विठ्ठल पाटील, जगदीश पाटील, शिरीष सैंदाणे, गौरव शिरसाठ, नितीन ढोकणे, पुरुषोत्तम पाटील, संगीता घोंगडे, मुकेश काटे यांचे सहकार्य लाभले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.