Taloda Market Committee : तळोदा बाजार समितीत मानधन आणि बैठक भत्ता न घेण्याचा एकमुखी निर्णय

Bajar Samiti News : तळोदा बाजार समिती संचालकांचा निर्णय
 Market Committee
Market CommitteeAgrowon

Market Committee Update Taloda : कृषी उत्पन्न बाजार (Agriculture Market Committee) समितीच्या पहिल्याच बैठकीत सभापती, उपसभापती व संपूर्ण संचालक मंडळाने मानधन व बैठक भत्ता न घेण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे.

बाजार समितीचे हित व आर्थिक स्थिती लक्षात घेऊन संचालक मंडळाने हा स्तुत्य निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांनी कौतुक केले आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक एप्रिलमध्ये होऊन सर्वपक्षीय संचालक मंडळ बिनविरोध निवडले गेले होते. त्यानंतर मंगळवारी (ता. ३०) संचालक मंडळाची पहिलीच बैठक सभापती तथा आमदार राजेश पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

सचिव सुभाष मराठे यांनी अजेंड्यावरील विषयांचे वाचन केले. त्यावर चर्चा करण्यात येऊन बाजार समितीचे गोडाउन, त्याची भाडेआकारणी यावर चर्चा केल्यानंतर बाजार समितीचे उत्पन्न वाढविण्याबाबत निर्णय घेण्यात आले.

 Market Committee
Taloda Market Committee Chairman : तळोदा बाजार समितीच्या सभापतिपदी आमदार पाडवी

सभापती श्री. पाडवी यांनी बाजार समितीची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन सभापतींना मिळणारे दोन हजार ५०० रुपयांचे मानधन न घेण्याचा निर्णय बैठकीत जाहीर केला. त्यानंतर उपसभापती व सर्वच संचालकांनीही बैठक भत्ता न घेण्याच्या निर्णय जाहीर केला.

तसा ठरावदेखील या वेळी करण्यात आला. दुसरीकडे बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे पगारही गेल्या १४ महिन्यांपासून थकलेले आहेत.

त्यामुळे बाजार समितीची इतर मार्गांनी येणारी आवक, मालमत्ता, महसूल याबाबत माहिती घेण्यात येऊन, त्यावर ठोस निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले.

 Market Committee
Taloda Market Committee Election : तळोदा बाजार समितीत बिनविरोधची परंपरा टिकणार की खंडित होणार

उपसभापती हितेंद्र क्षत्रिय, संचालक योगेश चौधरी, कल्पेश माळी, रोहिदास पाडवी, सुरेश इंद्रजित, अमृत गायकवाड, नीरज पाटील, अमोल भारती, निखिल तुरखिया, गौतम जैन, प्रकाश माळी, रवींद्र गाढे, लताबाई मराठे, रेखा माळी, कल्पनाबाई चौधरी आदी संचालक उपस्थित होते. सचिव श्री. मराठे यांनी सूत्रसंचालन केले. हेमंत चौधरी, प्रसाद बैकर, संजय कलाल, अजय मोठे व कर्मचाऱ्यांनी संयोजन केले.

बाजार समितीचे आर्थिक हित लक्षात घेऊन आपण स्वतः मानधन न घेण्याचा निर्णय बैठकीतच जाहीर केला होता.

माझ्या निर्णयाला सर्वच संचालकांनी उस्फूर्त प्रतिसाद देऊन, त्यांनीही बैठक भत्ता न घेण्याच्या निर्णय घेतला आहे. बाजार समितीचे उत्पन्न वाढविण्याबरोबरच विकासासाठी ठोस निधी आणणार आहोत.
- राजेश पाडवी, आमदार आणि सभापती, बाजार समिती, तळोदा, जि. नंदुरबार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com