Ramesh Bais : आमदारांसाठी प्रशिक्षणाची गरज : राज्यपाल बैस

MLA Training : विधानसभांच्या बैठकांमध्ये आमदार अभ्यास न करता येतात. चर्चेत सहभागी होत नाहीत. त्यामुळे अभ्यासू आमदार काय बोलतात ते समजत नाही.
Ramesh Bais
Ramesh BaisAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : ‘‘विधानसभांच्या बैठकांमध्ये आमदार अभ्यास न करता येतात. चर्चेत सहभागी होत नाहीत. त्यामुळे अभ्यासू आमदार काय बोलतात ते समजत नाही. एखादे विधेयक मंजूर करायचे असेल तर कोरम पूर्ण होण्यासाठी व्हीप बजावावा लागतो. हे निराशाजनक आहे. त्यामुळे संसदीय कामकाजासाठी आमदारांना विधीमंडळात जाण्याआधी तीन महिने प्रशिक्षण दिले पाहिजे,’’ असे मत राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केले.

‘बीकेसी’तील जिओ कन्वेंशन सेंटर येथे ‘एमआयटी’च्या वतीने आयोजित राष्ट्रीय आमदार परिषदेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विश्वनाथ कराड, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार, शिवराज पाटील, राहुल कराड आदी उपस्थित होते.

Ramesh Bais
Agriculture Mechanization : भारतात कृषी यंत्रसामग्रीसाठी १६ राज्यात दिलं जातं भरघोस अनुदान, महाराष्ट्राची सरशी

बैस म्हणाले, ‘‘आमदारांनी आपला मुद्दा योग्यरीत्या मांडला पाहिजे. अलीकडे सदस्य चर्चेत भाग घेतो तेव्हा वरवर बोलले जाते. त्यामुळे सदस्यांनी अभ्यासासाठी जास्तीत जास्त वेळ दिला पाहिजे. विधिमंडळाने डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून पेपरलेस कामकाज केले पाहिजे.’’

राज्यसभेचे उपसभापती हरिवंश म्हणाले,‘‘जग परिवर्तनाच्या उंबरठ्यावर आहे. कृत्रिम बुद्धीच्या या जगात अनेक आव्हाने आहेत. वेगाने बदलत्या जगात समाज पुढे कसा जाईल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आपल्याला काळानुरुप कायदे करणे गरजेचे आहे.’’

Ramesh Bais
Agriculture Inputs : अप्रमाणित निविष्ठांविरोधी कारवाईत पोलिसांचे असहकार्य

शिंदे म्हणाले,‘‘ही आमदार परिषद राजकारणापलीकडे आहे. विचार आणि योजनांबाबत एकमेकांशी विचारविनियम करण्याची संधी मिळाली आहे. आमदारांनी व्यक्तिगत लाभापेक्षा राज्यातील जनतेसाठी काय करू शकतो, हे पहिले पाहिजे.’’

सावंत म्हणाले,‘‘विधानसभा, विधानपरिषद आणि लोकसभेतील नवे कायदे, नियम बदलासंदर्भात आपल्याला गांभिर्याने विचार करावा लागेल. पुढील राष्ट्रीय आमदार परिषदेची जबाबदारी गोवा राज्य घेत आहे.’’

माजी उपराष्ट्रपती व्येंकय्या नायडू शनिवारी (ता.१७) म्हणाले, ‘‘कोणत्याही आमदाराला आपला पक्ष सोडायचा असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. पक्षांतरविरोधी कायद्याचा पुनर्विचार करण्याची गरज आहे.

‘सरकार उलथवणे चिंताजनक’

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले, ‘‘भारतीय लोकशाही मजबूत आहे. पण एकता आणि विविधतेचे रक्षण केले पाहिजे.’’ ‘‘ धर्मनिरपेक्षता, लोकशाही, सामाजिक न्याय आणि आर्थिक न्याय यांचे जतन आणि संरक्षण केले पाहिजे,’’असे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा करात म्हणाल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com