Maharashtra Politics Update: राष्ट्रवादी काँग्रेस वाचणार निकाल; शिंदे गटाविरोधात उघडणार मोहीम

NCP Vs Shinde Group : शिंदे-फडणवीस सरकार कसे असंविधानिक आहे, याचा पर्दापाश करणारा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभरात सुरू केला आहे.
Maharashtra Politics News
Maharashtra Politics NewsAgrowon
Published on
Updated on

ॲग्रोवन वृत्तसेवा
Mumbai News : राज्यातील सत्तासंघर्षावर न्यायालयालाचा निकाल आलेला असतानाच या निकालाचे जाहीर आणि सार्वजनिक पैलू स्पष्ट करत, शिंदे-फडणवीस सरकार कसे असंविधानिक आहे, याचा पर्दापाश करणारा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभरात सुरू केला आहे.

राज्यातील सत्तासंघर्षावर काही दिवसांपूर्वी निकाल आला. त्यानंतर शिंदे गट आपल्या बाजूने निकाल आल्याचे सांगत आहे. तसेच महाविकास आघाडीवरही जोरदार टीकास्त्र सोडत आहे.

मात्र न्यायालयाचा निकाल आणि वस्तुस्थिती याबाबत सामान्य जनतेला माहिती व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेतला आहे.

Maharashtra Politics News
Maharashtra Political Crisis News : सगळं चूक पण तरीही एकनाथ शिंदे यांचं सरकार बचावलं

या निकालाचे सविस्तर विश्लेषण लोकांना कळावे, यासाठी सोमवारी (ता. २९) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ‘चला या, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल समजून घेऊयात’ या परिसंवादाचे आयोजन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये होणार आहे.

दुपारी अडीच वाजता होणाऱ्या परिसंवादात न्यायालयाच्या निकालामधे प्रतोदांची ठरवलेली अवैध नेमणूक, पक्षांतर बंदीचा प्रचलित कायदा आणि राज्यपालांनी घटनेच्या चौकशीबाहेर निभावलेली भूमिका यावर प्रकाशझोत टाकला जाणार आहे.

न्यायालयाच्या निकालाचे शब्दाशः वाचन करताना या निकालाची कायदेशीर आणि संविधानिक बाजू मांडण्याची जबाबदारी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर सोपवली आहे.

जयंत पाटलांच्या संकल्पनेतून कार्यक्रम
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम राष्ट्रवादीने आयोजित केला असून, पवार यांच्या उपस्थितीत शिंदे-फडणवीस सरकारच्या असंविधानिक स्थापनेबाबतची भूमिका जनतेपुढे मांडण्याची राष्ट्रवाची ही अभिनव कल्पना आहे.

राज्यभरात पक्षाने अशाच प्रकारे या कार्यक्रमांचे आयोजन केले असून, न्यायालयाचा निकाल आणि सरकारची वैधता आणि लोकांमधील सरकारमधील नैतिकता याबाबतची जनजगारणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com