Natural Farming : नैसर्गिक शेती, आनंदी गाव उपक्रम शेतकरी हिताचे

विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर केलेलीआंबा, काजू लागवड, रोपवाटिका, देशी गोपालन, शेळीपालन, कुक्कटपालन, फळप्रक्रिया सुविधा आदींची पाहणीदेखील त्यांनी केली.
Natural Farming
Natural FarmingAgrowon
Published on
Updated on

सिंधुदुर्गनगरी ः किर्लोस विज्ञान केंद्राच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेले नैसर्गिक शेती (Natural Farming) आणि ‘समृद्ध गाव, आनंदी गाव’ उपक्रम हे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. या उपक्रमांचे भविष्यात चांगले परिणाम दिसून येतील, असे मत दापोली कृषी विद्यापीठाचे (Dapoli Agricultural University) शिक्षण विस्तार संचालक डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.

डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोलीचे शिक्षण विस्तार संचालक डॉ. सावंत यांनी किर्लोस विज्ञान केंद्राला भेट दिली. विज्ञान केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या नैसर्गिक शेती आणि समृद्ध गाव आनंदी गाव या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची त्यांनी पाहणी केली.

केंद्रांमार्फत फळ प्रक्रिया प्रकल्प, कुक्कटपालन, भुईमूग लागवड, कलिंगड लागवड यासह विविध कृषिपूरक शेतकरी उद्योजक निर्माण व्हावेत यासाठी प्रयत्न केले जात असल्यामुळे श्री. सावंत यांनी या उपक्रमांची प्रशंसा केली.

विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर केलेलीआंबा, काजू लागवड, रोपवाटिका, देशी गोपालन, शेळीपालन, कुक्कटपालन, फळप्रक्रिया सुविधा आदींची पाहणीदेखील त्यांनी केली.

Natural Farming
Organic Farming: सेंद्रिय शेतीचे घोडे नेमके अडते कुठे?

या वेळी सावंत म्हणाले, की सरकारचा कल नैसर्गिक शेतीकडे आहे. विज्ञान केंद्राने भविष्याचा वेध घेऊन नैसर्गिक शेतीच्या दृष्टीने उचललेली पावले ही खूप महत्त्वाची आहेत.

सावंत यांनी जीवामृत, पंचगव्य वापरून शेतकरी सुरेश मापारी शेती करतात. त्यांच्या शेतीची देखील पाहणी केली.

किर्लोस विज्ञान केंद्राचे अध्यक्ष ब्रिगेडिअर सुधीर सावंत, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विलास सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश पेडणेकर, बाळकृष्ण गावडे, विकास धामापुरकर, विवेक सावंत, सुमेधा तावडे आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com