National Congress : दौंड खरेदी-विक्री संघावर ‘राष्ट्रवादी’चे वर्चस्व कायम

दौंड तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत पॅनेलने १७ पैकी १४ जागा बिनविरोध झाल्या आहेत.
National Congress
National Congress Agrowon

दौंड, जि. पुणे ः दौंड तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत (National Congress Party) पॅनेलने १७ पैकी १४ जागा बिनविरोध झाल्या आहेत. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे ज्येष्ठ संचालक रमेश थोरात यांनी संघावरील निर्विवाद वर्चस्व कायम राखले आहे. तर, संस्था गटातील पिंपळगाव, वरवंड व पाटस गटातील तीन जागांसाठी निवडणूक होणार असून, त्याकरिता सात उमेदवार रिंगणात आहे.

National Congress
औरंगाबाद दूध संघावर एकता पॅनेलचे वर्चस्व 

सहकार भवन येथे बुधवारी (ता. २८) दौंड तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. राष्ट्रवादीचे नेते तथा माजी आमदार रमेश थोरात यांच्या पुढाकाराने १७ पैकी १४ जागा बिनविरोध झाल्याची माहिती पक्षाचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार यांनी दिली.

National Congress
Milk Industry : दूध खरेदी-विक्री दरात एकसूत्रता आणणार

बिनविरोध निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे
- संस्था गट : कासुर्डी - सदानंद वामन दोरगे, खामगाव - विजय पंढरीनाथ नागवडे, केडगाव - ज्ञानेश्वर साहेबराव शेळके, पारगाव - नानासाहेब गुलाबराव जेधे, नानगाव - विश्वास राजाराम भोसले, दौंड - जयवंत रामचंद्र गिरमकर, रावणगाव - गजानन नारायण गुणवरे

- वैयक्तिक प्रतिनिधी गट : प्रेमनाथ बबनराव दिवेकर, पुरुषोत्तम बाळासाहेब हंबीर

- महिला प्रतिनिधी : सविता अप्पासाहेब ताडगे, नंदा दत्तात्रेय ताकवणे

- अनुसूचित जाती-जमातीतील प्रतिनिधी : विकास अनिल कांबळे

- इतर मागास वर्ग प्रतिनिधी : संपत मारुती शेलार

- विमुक्त जाती प्रतिनिधी : आश्रू सोमा डुबे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com