Bribe
Bribe Agrowon

Bribe News : संप काळातही लाचखोरी, नायब तहसीलदार अडकला

सध्या वाळूगटाचे लिलाव झाले नसताना अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. महसूलसह पोलिस विभागाचे त्याला आशीर्वाद असल्याची तक्रार नेहमीच समोर येत असते.
Published on

Jalgaon Bribe News धरणगाव, जि. जळगाव : अवैध वाळू वाहतूक (Illegal Sand Transport) करताना कुठलीही कारवाई करू नये आणि वाहतूक सुरू राहू देण्यासाठी वाळू व्यावसायिकाकडून २५ हजारांची लाच (Bribe) घेताना धरणगाव येथील कोतवालासह त्याला प्रोत्साहन देणाऱ्या नायब तहसीलदाराला गुरुवारी (ता. १६) अटक करण्यात आली.

Bribe
Amravati Bribe News : नाहरकत प्रमाणपत्रासाठी सरपंचाने स्वीकारली लाच

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा सध्या संप सुरू असून, महसूलसह सर्व कार्यालये ओस पडली असताना, कोतवाल व नायब तहसीलदाराने हा प्रकार केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सध्या वाळूगटाचे लिलाव झाले नसताना अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. महसूलसह पोलिस विभागाचे त्याला आशीर्वाद असल्याची तक्रार नेहमीच समोर येत असते.

Bribe
Bribe News : सहकार विभागाच्या सहायक निबंधकास लाच घेताना अटक

अशातच धरणगाव तहसील कार्यालयात महसूल विभागातील नायब तहसीलदार जयवंत भट व कोतवाल राहुल नवल शिरोळे याने तक्रारदारास डंपरने वाळू वाहतूक सुरू राहू देण्यासाठी संबंधित वाळू व्यावसायिकाकडे ३० हजारांची लाच मागितली होती.

तडजोडीअंती २५ हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र तक्रारदाराने जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंदर्भात तक्रार दिली. त्यावरून गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास एसीबीचे डीवायएसपी शशिकांत पाटील यांनी त्यांच्या पथकासह लाच घेताना कोतवालासह नायब तहसीलदारांना ताब्यात घेतले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com