Bore Well Viral News : ...आणि जुन्या कूपनलिकेतील बंद विद्युतपंप बाहेर आला

राळेगण म्हसोबा येथील अनिल कोतकर यांच्या आजोबांनी १९९०-९५ च्या दरम्यान कामठी रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात कूपनलिका घेतली.
Electric Pump
Electric PumpAgrowon

नवनाथ खराडे

नगर ः काही वर्षांपूर्वी घेतलेल्या कूपनलिकेमधील विद्युत पंप (Bore Well Pump) खराब झाला. तो काढण्याचा प्रयत्न शेतकऱ्याने केला, मात्र त्यात यश मिळाले नाही. कूपनलिकेतील बंद पडलेला विद्युत पंप काढण्यासाठी जास्त खर्च येत असल्याने नवीन कूपनलिका घेण्याचे ठरले.

त्याची प्रक्रिया सुरू झाली. पूर्वीच्या कूपनलिकेपासून अंदाजे ६० फूट अंतरावर नवीन कूपनलिका घेतला जात होती.

हे काम सुरू असतानाच, पूर्वीच्या बंद कूपनलिकेमधून लोखंडी पाइपसह पंप उंच उडून बाहेर आला.

ही घटना जिल्ह्यातील राळेगण म्हसोबा (ता. नगर) येथे अनिल रमेश कोतकर यांच्या शेतात मंगळवारी (ता. २४) घडली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

राळेगण म्हसोबा येथील अनिल कोतकर यांच्या आजोबांनी १९९०-९५ च्या दरम्यान कामठी रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात कूपनलिका घेतली.

त्या वेळी तिची खोली साधारणपणे १५० फूट होती. कूपनलिकेला मोठ्या प्रमाणात पाणी लागले. त्या काळी पंपाला लोखंडी पाइपचा वापर केला जात असे. या कूपनलिकेमधील पंप नादुरुस्त झाला.

तो बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्याने मोठा प्रयत्न केला, मात्र पंप निघाला नाही. त्यासाठी दहा ते पंधरा हजार रुपये खर्चही करण्यात आला. मग शेतकऱ्याने त्याचा नाद सोडून दिला.

नवीन कूपनलिकेतील घेण्याचे ठरले. मंगळवारी (ता. २४) मशिन बोलाविण्यात आले. पूर्वीच्या कूपनलिकेपासून साधारणपणे ६० फूट अंतरावर नवीन कूपनलिका घेण्याची प्रक्रिया सुरू झाली.

Electric Pump
योग्य पद्धतीने करा कूपनलिका पुनर्भरण

ही प्रक्रिया सुरू असताना तब्बल २० फूट उंचीइतक्या प्रेशरचे पाणी लागले. कूपनलिका खाली जात नव्हती. ४० मिनिटे हवेचा उच्च दाब दिला जात होता.

त्या वेळी घरातील एक सदस्य पाण्याचा व्हिडिओ काढत होता. याच वेळी पूर्वीच्या कूपनलिकेमधून प्रचंड वेगाने जुना पंप आकाशाच्या दिशेने बाहेर फेकला गेला.

हे सर्व दृश्‍य व्हिडिओमध्ये चित्रीत झाले आहे. अचानक झालेल्या या प्रकाराची सर्वदूर चर्चा होत आहे.

जुनी बोअरवेल खराब झाल्याने नवीन बोअरवेल घेतली. नवीन आणि जुन्या बोअरवेलचा संपर्क एकच असावा. त्यामुळे पूर्वीच्या बोअरवेलमधून पंप बाहेर फेकला गेला.
अनिल कोतकर, शेतकरी, राळेगण म्हसोबा, ता. नगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com