Radhakrushna Vikhe Patil
Radhakrushna Vikhe PatilAgrowon

Radhakrushna VikhePatil : तृणधान्यात नगर देशात अग्रेसर करणार

राधाकृष्ण विखे-पाटील : नगर महोत्सवाचे उद्‌घाटन, जिल्हा परिषदेकडून आयोजन

नगर : देशात यावर्षी आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष (Millet Year) साजरे केले जात आहे. त्याअनुषंगाने कृषी विभागाच्या मदतीने तृणधान्याचे वेगवेगळे क्लस्टर तयार करून, नगर जिल्हा तृणधान्य उत्पादनात (Millet Production) देशात पहिल्या क्रमांकावर नेण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna VikhePatil) यांनी सांगितले.

नगर येथे कृषी विभाग, जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व पशुसंवर्धन विभागाच्या एकत्रित ‘नगर महोत्सवा’चा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. १०) उद्‌घाटन झाले.

पद्मश्री पोपटराव पवार, खासदार डॉ. सुजय विखे-पाटील, आमदार बबनराव पाचपुते, राम शिंदे, माजीमंत्री शिवाजी कर्डीले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आशिष येरेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, कृषी उपसंचालक रवींद्र माने, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुनील पठारे, महापालिकेचे आयुक्त पंकज जावळे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Radhakrushna Vikhe Patil
RadhaKrushna Vikhe Patil : वाळूबाबत लवकरच नवे धोरण राबवणार

विखे पाटील म्हणाले, नगर जिल्ह्यामध्ये महिला बचत गट चळवळीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महिला सक्षमीकरणासाठी काम केले जात आहे.

महिला बचत गटाच्या साहित्याची ऑनलाइन विक्री करण्याची व्यवस्था केली जात असून त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

याशिवाय महिला सक्षमीकरणासाठी जेवढा निधी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देऊ, असे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.

Radhakrushna Vikhe Patil
बुलडाणा ज्वारी लागवडीत विभागात अग्रेसर

शेतकरी गट शेतकरी कंपन्या व महिला बचत गटाच्या माध्यमातून तृणधान्य उत्पादनात नगर जिल्हा देशात पहिला आणण्यासाठी प्रयत्न केले जात असून शेतकऱ्यांनी यात पुढाकार घ्यावा.

शेतकऱ्यांना जे तंत्रज्ञान लागेल त्याचा पुरवठा करू, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले. प्रारंभी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आशिष येरेकर यांनी प्रास्ताविक केले.
साईज्योती ई-कॅटलॉग’ अॅपचे उद्‌घाटन
पाच दिवस चालणाऱ्या ‘नगर महोत्सवा’मध्ये २०० महिला बचत गटाचे स्टॉल, १०० खाद्य पदार्थ स्टॉल, २०० कृषी विषयक स्टॉल आहेत.

नगर जिल्ह्यातील सहकार, शेती, इतिहास आदीची माहिती देणारा विशेष लोगो, महिला बचत गटाच्या उत्पादन विक्रीसाठी ‘साईज्योती ई-कॅटलॉग’ या अॅपचे उद्‌घाटन करण्यात आले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com