एसटी कर्मचाऱ्यांना न्यायालयाचा दिलासा; मुदतीतच कामावर परतण्याचा परिवहन मंत्र्यांचा इशारा!

पाच महिन्यांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आता ब्रेक लागण्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला आहे.
Mumbai High Court has ordered ST employees to return to work by April 22
Mumbai High Court has ordered ST employees to return to work by April 22Agrowon

पाच महिन्यांपासून सुरु असलेल्या एसटी (ST) कर्मचाऱ्यांच्या संपाला आता ब्रेक लागण्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना येत्या २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. यावर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत एसटी कर्मचाऱ्यांवरील शिस्तभंगाची कारवाई मागे घेणार असल्याचे सांगितले.

एसटी कर्मचाऱ्यांना येत्या २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार एसटी कर्मचारी २२ एप्रिलपर्यंत रुजू न झाल्यास त्यांना कामाची आवश्यकता नाही, असे समजून सेवा समाप्त केली जाईल.

या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन, ग्रॅच्युएटीचा लाभ देण्याबाबत आदेश देण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. उच्च न्यायालयाने संपकरी कर्मचाऱ्यांच्या शक्य त्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान एसटी संपाबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आवाहन केले. परब यांनी म्हटले की, एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, प्रशासन कारवाई करणार नाही, असे सात वेळेस आवाहन केले होते.

उच्च न्यायालयातही आम्ही हीच भूमिका मांडली. कर्मचाऱ्याची नोकरी जावी म्हणून कारवाई केली नाही. मात्र, प्रशासन म्हणून शिस्तभंगाची कारवाई करावी लागली होती. आता कोणतीही कारवाई करणार नसल्याचे एसटी महामंडळाने उच्च न्यायालयात सांगितले असल्याचे परब म्हणालेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com