
नगर ः नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी (Graduate Election) अंतिम मतदार यादी जाहीर झाली आहे. त्यात विभागात एकूण २ लाख ६२ हजार ७३१ अंतिम मतदार निश्चित झाले आहेत. त्यात सर्वाधिक जवळपास ४५ टक्के मतदार हे नगर जिल्ह्यातील आहेत.
नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक होत आहे. मतदार संघात सलग तीन वेळा प्रतिनिधित्व केलेले आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्याएवजी त्यांचे चिरंजीव सत्यजीत तांबे अपक्ष लढत आहेत. त्यामुळे या मतदार संघात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
सत्यजीत तांबे यांच्यासह १६ अमेदवार रिंगणात आहेत. मतदार संघातील पदवीधर मतदारांची संख्या निश्चित झाली आहे.
निडणूकीत एकूण २ लाख ६२ हजार ७३१ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. त्यात सर्वाधिक मतदार नगर जिल्ह्यात असल्याने नगरवर सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष आहे.
नाशिक विभागातील मतदान केंद्रांचीही संख्या जाहीर करण्यात आली आहे. विभागात एकूण ३३८ मतदान केंद्रे आहेत. मतदार संख्या अधिक असल्याने आपसूकच मतदान केंद्राची संख्याही नगर जिल्ह्यात सर्वाधिक १४७ आहे.
नाशिकमध्ये ९९, जळगाव जिल्ह्यात ४०, धुळ्यात २९ आणि नंदुरबार जिल्ह्यात २३ मतदान केंद्रे आहेत. विभागात एकूण ३३८ मतदान केंद्रे आहेत. नगर जिल्ह्यात १ लाख १५ हजार ६३८ मतदार आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.