Enam Silk : ई-नाम पद्धतीने रेशीम कोषाची एक कोटीहून अधिक उलाढाल

बारामतीत तीन महिन्यांत २३४ शेतकऱ्यांकडून १९.५ टन कोषांची विक्री
Enam Silk
Enam SilkAgrowon

पुणे : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीत (In the Baramati Agricultural Produce Market Committee ) ई-नाम (Enam) पद्धतीने रेशीम कोष (Silk Cocoon) खरेदी-विक्री सुरू आहे. मागील तीन महिन्यांत येथे २३४ शेतकऱ्यांनी १९.५ टन कोषांची विक्री केली आहे. त्यातून शेतकऱ्यांना एक कोटी १४ लाख २ हजार ९७४ एवढी रक्कम मिळाली आहे. योग्य भाव व लगेच पेमेंट यामुळे मार्केटबाबत (Market) शेतकऱ्यांचा विश्‍वास वाढत असल्याने खरेदी- विक्री वाढत आहे.

Enam Silk
राज्यात तीन वर्षांत ‘ई-नाम’द्वारे साडेतीन हजार कोटींची उलाढाल

रेशीम संचालनालय नागपूर व कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती यांच्या समन्वयाने कृषी उत्पन्न बाजार समितीत २८ सप्टेंबरपासून ई-नाम पद्धतीने कोष खरेदी- विक्री सुरू आहे. यामुळे येथे जिल्ह्यातील व पुणे विभागातील शेतकरी कोष विक्रीसाठी घेऊन येत आहे. ई-नाम पद्धतीमुळे राज्यातील व राज्याबाहेरील रिलर्स यामध्ये ऑनलाइन सहभाग घेत आहेत. रिलर्स न खरेदी केलेल्या कोषांना ड्राय करायची आवश्यकता वाटल्यास ड्रायरची सुविधा त्यांना देण्यात आली आहे. यामुळे रिलर्ससाठी देखील सदरचे मार्केट वरदान ठरत आहे.

Enam Silk
Silk Farming : शेतकरी नियोजन ः रेशीम शेती

केंद्र शासनाच्या बंगलोर येथील केंद्रीय रेशीम मंडळाच्या सहकार्यामुळे कोषांची प्रतवारी तपासणी प्रयोगशाळा (ककून टेस्टिंग लॅब) सूरू करण्यात आली आहे. त्यामुळे मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी कोष विक्रीसाठी आणल्यानंतर तेथे कोषांची प्रतवारी तपासली जाते. त्या प्रतवारीनुसार रिलर्स ऑनलाइन बोली बोलतात. शेतकऱ्यांना कोषांच्या प्रतीनुसार दर दिला जातो. लगेचच त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होत आहे.

यासाठी जिल्हा रेशीम कार्यालयातील एक वरिष्ठ कर्मचारी व कृषी उत्पन्न बाजार समितीकडून एक कर्मचारी असे दोन कर्मचारी काम पाहत असून, ते शेतकरी व रिलर्समध्ये समन्वय ठेवून काम करत आहे. कोषांची प्रतवारी तपासून ई-नाम पद्धतीने कोषांची खरेदी विक्री करण्याचे अशा पद्धतीचे मार्केट हे फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील पहिले कोष खरेदी विक्री मार्केट आहे. यामुळे विभागातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या मार्केटचा फायदा घ्यावा, असे पुणे प्रादेशिक रेशीम कार्यालयांच्या सूत्रांनी आवाहन केले.

पुणे विभागात मोठ्या प्रमाणात शेतकरी रेशीम करतात. त्याच्यासाठी हे केंद्र अत्यंत जवळचे आहे. येथे ई-नाम पद्धतीने रेशीम कोषाची खरेदी-विक्री केली जात असल्याने शेतकऱ्यांना एकप्रकारे फायदाच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रेशीम शेती करून आर्थिक उत्पन्न वाढविण्याची ही संधी आहे.
- डॉ. कविता देशपांडे, सहायक संचालक, प्रादेशिक रेशीम कार्यालय, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com