Monsoon Session : संसदेत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या गटाचा व्हीप अधिकृत ?

No Confidence Motion : शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने दोन्ही पक्षांतील कोणत्या गटाचे व्हिप वैध राहील, हा मुख्य प्रश्न राहणार आहे. यामुळे या दोन्ही पक्षांच्या खासदारांच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष राहणार आहे.
Parliament
ParliamentAgrowon

Parliament News: मोदी सरकारच्या विरोधात विरोधकांनी दिलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा होण्याची निश्चित तारीख व वेळ पुढील आठवड्यात निश्चित होण्याची शक्यता आहे. या वेळी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने दोन्ही पक्षांतील कोणत्या गटाचे व्हिप वैध राहील, हा मुख्य प्रश्न राहणार आहे. यामुळे या दोन्ही पक्षांच्या खासदारांच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष राहणार आहे.

Parliament
Shivsena Crisis : शिवसेना अन् धनुष्यबाण कोणाचा?, सर्वाच्च न्यायालयात 31 जुलैला सुनावणी

काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी विविध विरोधी पक्षांच्या ५० खासदारांच्या स्वाक्षरीने अविश्वास प्रस्तावाची नोटीस लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांना दिली आहे. हा प्रस्ताव लोकसभा अध्यक्षांनी स्वीकारल्याने हे अधिवेशन संपण्यापूर्वी अविश्वास प्रस्तावावर चर्चा होणार आहे. पावसाळी अधिवेशन येत्या ११ ऑगस्टपर्यंत आहे. त्यापूर्वी यावर चर्चा होणार आहे.

अविश्वास प्रस्तावावर मतदानापूर्वी प्रत्येक राजकीय पक्ष पक्षादेश जारी करीत करतात. हा व्हिप प्रत्येक खासदाराला बंधनकारक असतो. हा व्हिप न मानल्यास खासदारावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते. यामुळे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेल्या पक्षामुळे कोणत्या गटाचा व्हिप अधिकृत राहणार हा प्रश्न कायम राहणार आहे.

गेल्या वर्षी शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर शिवसेनेच्या १३ खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास दाखविला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्हही याच गटाला दिले आहे. लोकसभा अध्यक्षांनी शिवसेनेचे गटनेते म्हणून लोकसभेत विनायक राऊत यांच्याऐवजी राहुल शेवाळे यांच्या नावाला मान्यता दिली आहे. तसेच प्रतोद म्हणून भावना गवळी कायम आहे. यामुळे शिवसेनेच्या फुटीर गटाच्या खासदारांना धोका दिसत नाही. परंतु मूळ शिवसेनेचे सदस्य असलेले उर्वरित ५ खासदारांना कुणाचा व्हिप लागू होणार, हा प्रश्न कायम आहे.

Parliament
NCP Crisis : राष्ट्रवादीत निलंबन, निवडीचे अधिकार शरद पवारांनाच, जितेंद्र आव्हाड यांची अजित पवार गटावर टीका

ठाकरे गटाला निवडणूक आयोगाची मान्यता

निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या नावाच्या पक्षाला मान्यता दिली आहे. तसेच चिन्ह मशाल दिले आहे. ही मान्यता अद्याप कायम आहे. तसेच या गटाने लोकसभेत आम्हाला वेगळे कक्ष द्यावा, अशी मागणी केली आहे. या गटात विनायक राऊत, अरविंद सावंत, राजन विचारे, संजय जाधव व ओमराजे निंबाळकर यांचा समावेश आहे. शिंदे गटाकडून सर्वांना १८ खासदारांना व्हिप जारी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा व्हिप ठाकरे गटाच्या खासदारांना लागू होणार काय की वेगळा पक्ष म्हणून त्यांची मान्यता कायम राहील, हा प्रश्न कायम आहे.

तटकरेंची अडचण

राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभा पाच सदस्य आहेत. त्यापैकी केवळ एकच खासदार अजित पवार यांच्या गटाचा आहे. उर्वरित चार खासदारांनी शरद पवार यांच्यावर निष्ठा कायम ठेवल्याने खासदार सुनील तटकरे यांचीच अडचण होण्याची शक्यता आहे. लोकसभेत राष्ट्रवादीच्या गटनेत्या सुप्रिया सुळे आहेत. या वेळी व्हिप जारी केल्यानंतर खासदार तटकरे यांची भूमिका प्रस्तावाच्या बाजूने राहते की, विरोधात राहते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. व्हिप न मानल्यास त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते. अजित पवार गटाला अद्याप वेगळा पक्ष म्हणून निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने व्हिपच न काढल्यास त्यांचा बचाव होऊ शकतो.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com