

नगर ः ग्रामपंचायत निवडणुकीतून थेट घराघरात बंड होत असल्याचे पाहायला मिळत आहे. नगर जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या काष्टी (ता. श्रीगोंदा) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत थेट माजी मंत्री, आमदार बबनराव पाचपुते यांच्या कुटुंबातच फूट पडली आहे.
काष्टीच्या निवडणुकीत आमदार पाचपुते यांनी मुलगा प्रताप यांना सरपंचपदाची उमेदवारी दिल्याने आमदार पाचपुते यांचे बंधू स्व. सदाशिव पाचपुते यांचे चिरंजीव साजन पाचपुते यांनी बंड करत विरोधी बाजूंकडूने सरपंचपदासाठी उभे असल्याने काष्टीत ग्रामपंचायत निवडणुकीत सख्खे चुलत भाऊ आमनसामने आले आहेत.
गावपातळीवर ग्रामपंचायतीचे राजकारण पाया समजला जात आहे. तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर काम करणारे नेतेही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विशेष लक्ष घालतात. या वेळी सरपंचाची निवडणूक जनतेतून होत असल्याने सरपंचपदांसाठी संघर्ष सुरू झाला आहे. नगर जिल्ह्यात होत असलेल्या प्रमुख ग्रामपंचायतीत काष्टी (ता. श्रीगोंदा) ग्रामपंचायत महत्त्वाची मानली जात आहे. येथील सेवा सहकारी सोसायटीचीही आदर्श आहे. काष्टी हे माजी मंत्री, आमदार बबनराव पाचपुते यांचे गाव आहे. यापूर्वी त्यांची येथे सत्ता राहिली आहे. पाचपुते यांचे बंधू स्व. सदाशिव पाचपुते यांचे श्रीगोंदा तालुक्याच्या राजकारणात मोठे योगदान राहिले आहे.
आमदार बबनराव पाचपुते व स्व. सदाशिव पाचपुते यांची गावपातळीपासून ते विधानसभा, लोकसभा निवडणुकीत एकीची ताकद दिसली. सतरा सदस्यसंख्या असलेल्या काष्टीच्या असलेल्या ग्रामपंचायत, सरपंचपदासाठीच्या निवडणुकीत आमदार बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव प्रताप यांना उमेदवारी दिल्यानंतर पाचपुते कुटुंबात त्यांचे पुतणे साजन यांनी विरोधकांना सोबत घेऊन बंड केले आहे. त्यामुळे चाळीस वर्षांपासून राजकारणात पकड असलेल्या आमदार पाचपुते यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. काष्टीत सरपंचपदासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल कोकाटे हे ही रिंगणात असणार आहेत.
बहुतांश गावांत दुरंगी लढती
ग्रामपंचायतीच्या सरपंच, सदस्यपदाच्या १८ डिसेंबरला मतदान होत असलेल्या निवडणुकीसाठी बहुतांश गावांच्या लढती स्पष्ट झाल्या आहेत. एकापेक्षा अधिक अर्ज दाखल झाले होते. मात्र माघारीच्या दिवशी गावपातळीवर तडजोडीतून अर्ज मागे घेत एकास-एक उमेदवार असल्याने दुरंगी लढती होणार हे स्पष्ट झाले आहे. यावेळी पहिल्यांदाच जिंकण्यासाठी राजकीय नेत्यांनी आपापल्या गटांना सर्वोतपरी ताकद दिल्याचे पाहायला मिळाले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.