Radhakrishna Vikhe Patil : गुंठेवारी, तुकडे बंदीबाबत महसूल मंत्री विखे पाटील स्पष्टच म्हणाले...

Radhakrishna Vikhe Patil : गुंठेवारी, तुकडे बंदीबाबत परिपूर्ण धोरण तयार केले आहे. ते येत्या १५ जुलैपर्यंत जाहीर केले जाईल, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले.
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patilagrowon
Published on: 
Updated on: 

Minister Radhakrishna Vikhe Patil : महाराष्ट्रात गुंठेवारी आणि तुकडे बंदी आदेश लागू करण्यात आल्यापासून तुकड्यांची खरेदी प्रक्रीया बंद आहे. परंतु ही बंदी उठवावी म्हणून मागणी होत आहे. यामुळे सरकार यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान यावर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वक्तव्य केल्याने हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. विखे पाटील कोल्हापूर दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना चर्चा केली.

गुंठेवारी आणि तुकडेबंदीबाबत विखे पाटील म्हणाले की, गुंठेवारी, तुकडे बंदीबाबत परिपूर्ण धोरण तयार केले आहे. ते येत्या १५ जुलैपर्यंत जाहीर केले जाणार असल्याची माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.

याचबरोबर तुकडेबंदी, गुंठेवारी या दोन्ही विषयांत साम्य असल्याने दलालांनी सामान्य नागरिकांची मोठी फसवणूक केली आहे. अनेक ठिकाणी दस्त ऑनलाईन दिसत नाहीत, ते पेडिंग ठेवायचे, मागच्या दाराने त्याला मान्यता द्यायची. त्यात काही अधिकारीही सामील आहेत, त्यांच्या चौकशीचे आदेश दिले असल्याचीही माहिती विखे पाटील यांनी दिली.

Radhakrishna Vikhe Patil
Raju Shetti : राजू शेट्टींकडून ही अपेक्षा नाही, राधाकृष्ण विखे पाटलांची टीका

पशुखाद्याच्या वाढत्या दरावर विखे पाटलांचे व्यक्तव्य

पशुखाद्यांच्या वाढत्या दराला कोणतेही बंधन नाही, असे सांगतानाच २५ टक्के दर कमी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यापूर्वी या कंपन्या, पशुखाद्यांच्या पोत्यावर त्यात न्यूट्रिशन व्हॅल्यू किती आहे हे लिहित नव्हत्या. त्यांना ते लिहिणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी समिती नेमली आहे.

कच्च्या मालाचे दर वाढले, असे नेहमी तुणतुणे वाजवले जाते. मग जेव्हा कच्च्या मालाचे दर कमी होतात, तेव्हा या कंपन्या दर कमी करतात का, असा सवालही त्यांनी केला.

अमूल किंवा कोणत्याही परराज्यांतील दूध संस्थेला बंदी घालण्याचा कोणताही प्रस्ताव राज्य शासनासमोर नाही, अथवा बंदीची आवश्यकताही नाही, असे स्पष्ट करत विखे-पाटील म्हणाले, अमूल सहकारी संस्थेचे फेडरेशन आहे. ती खासगी संस्था नाही.

राज्यात दुधाची मागणी आणि पुरवठा यांच्यात तफावत आहे. ते 40 रुपये देतात, आम्ही 35 रुपये देतो. आम्ही शेतकर्‍यांसाठी स्पर्धा करायची नाही का, असा सवालही त्यांनी केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.