Buldana Agri College : बुलडाण्यात कृषी महाविद्यालय स्थापनेस मनुष्यबळाची अडचण

Agriculture College In Maharashtra : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत बुलडाण्यात भाऊसाहेब फुंडकर कृषी महाविद्यालय स्थापनेला शासनाने मंजुरी दिली आहे.
PDKV AKOLA
PDKV AKOLA Agrowon

Akola News : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत बुलडाण्यात भाऊसाहेब फुंडकर कृषी महाविद्यालय स्थापनेला शासनाने मंजुरी दिली आहे. या सत्रापासूनच हे महाविद्यालय कार्यरत होण्याची शक्यता आहे. मात्र आधीच अधिकारी, कर्मचाऱ्यांची सुमारे ५० टक्क्यांपर्यंत पदे रिक्त आहेत. त्यात हे नवे महाविद्यालय कसे चालवावे ही अडचण विद्यापीठासमोर उभी आहे.

२०१६-१७ मध्ये या कृषी महाविद्यालयाची घोषणा झाली होती. तेव्हापासून या महाविद्यालयाचा प्रश्‍न रेंगाळला. हे महाविद्यालय बुलडाण्यात की मोताळा तालुक्यात, यावरूनही बरीच ओढाताण झाली.

हा विषय संवेदनशील बनल्याने लोकप्रतिनिधी व शासनाने त्याला कायमच बाजूला ठेवले. शिंदे सरकार स्थापन होताच या महाविद्यालयाच्या कामाला गती मिळाली. त्यानंतर मंजुरीचा आदेशही निघाला. आता हे महाविद्यालय स्थापन करण्याबाबत अंतिम शिक्कामोर्तब झाले आहे.

PDKV AKOLA
Akola Veterinary College : अकोल्यातील नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयास मान्यता

‘पंदेकृवि’अंतर्गत बुलडाणा येथील महाविद्यालयात ६० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. या शासकीय कृषी महाविद्यालयात सध्या प्रचलित असलेला चार वर्षांचा कृषी पदवी हा अभ्यासक्रम शिकविला जाईल. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणाची जोड दिल्यास पदवी प्राप्त केलेले विद्यार्थी परिसरात तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणून कार्य करू शकतील.

PDKV AKOLA
Women Agri College : औरंगाबादला देशातील पहिले महिला कृषी महाविद्यालय

फुंडकर यांचा सन्मान

बुलडाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र व राज्याचे कृषिमंत्री पद सांभाळलेले (कै.) भाऊसाहेब फुंडकर यांचे नाव या महाविद्यालयाला देऊन शासनाने फुंडकर यांचा एक प्रकारे सन्मान केल्याचे मानले जात आहे. या महाविद्यालयाला मंजुरी देताना आवश्यक मनुष्यबळ व इतर पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया राबवावी, असे सुचविण्यात आलेले आहे.

शिवाय या ठिकाणी भरायची शिक्षकवर्गीय ४५ व शिक्षकेत्तर ४३ पदे ही मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीच्या मान्यतेच्या अधीन राहून निर्माण करण्याबाबत मान्यता देण्यात आली. आता ही समिती महाविद्यालय सुरू करण्यासाठी तातडीने किती पदांना व कधी मंजुरी देते यावरच मनुष्यबळ भरती प्रक्रिया राबविण्याचे अवलंबून आहे.

या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात एक नवे कृषी महाविद्यालय सुरू होणे ही गौरवाची बाब आहे. यामुळे ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील. हे महाविद्यालय सुरू करण्यासाठी मनुष्यबळ व पायाभूत सुविधा आवश्‍यक आहेत. त्या उपलब्ध होण्याच्या उद्देशाने शासनाकडे तातडीने मागणी करणार आहोत.
- डॉ. शरद गडाख, कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com