ST Bus Transport : मंगळवेढा आगाराची बस वाहतूक गती कधी वाढणार?

अलीकडच्या काळात एसटी बंद असल्यामुळे मंगळवेढ्यातून सोलापूरला जाण्यासाठीच्या प्रवासासाठी तब्बल दीड ते दोन तास प्रवास करावा लागत आहे.
St Bus
St BusAgrowon
Published on
Updated on

Mangalvedha Bus Issue : नागपूर, रत्नागिरी हा राष्ट्रीय महामार्ग मंगळवेढ्यावरून सोलापूरला गेल्यामुळे या मार्गावरील वाहनांची गती वाढली आहे. परंतु मंगळवेढा आगाराच्या एसटीची (ST Bus) गती मात्र वाढत नसल्यामुळे प्रवासी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.

सकाळच्या सत्रात सोलापूरहून मंगळवेढ्यास व मंगळवेढ्यावरून सोलापूर, मोहोळ तालुक्यात नोकरीच्या निमित्ताने कामावर जाण्यासाठी तसेच कामती, बेगमपूर, सोलापूर येथे जाण्यासाठी प्रवासी एसटी बसच्या प्रतीक्षेत असतात.

St Bus
St Bus : एसटीच्या ‘बीओटी’तील कामात श्रीरामपूर स्थानक घ्या

मंगळवेढा- सोलापूर या मार्गावर एसटीच्या सर्व थांब्यांवर थांबणाऱ्या, दर अर्ध्या तासाला एसटी गाड्या असूनही सकाळच्या सत्रात नोकरी व अन्य कामानिमित्त सोलापूरला जाण्यासाठी मंगळवेढा- सोलापूर सुपर एसटीची यापूर्वी व्यवस्था होती.

परंतु अलीकडच्या काळात ही एसटी बंद असल्यामुळे मंगळवेढ्यातून सोलापूरला जाण्यासाठीच्या प्रवासासाठी तब्बल दीड ते दोन तास प्रवास करावा लागत आहे.

St Bus
Electric Bus : ‘एसटी’त भाडेतत्त्वावर पाच हजार इलेक्ट्रिक बस

पण याच प्रवासाचा कालावधी खासगी वाहनाने एक तासापेक्षा कमी लागत असल्याने प्रवाशांची पसंती खासगी वाहनांना आहे.

एकीकडे एसटी महामंडळ तोट्यात आहे आणि प्रवासी वाढवण्याच्या दृष्टीने वेगळे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत असताना या मार्गावर निश्चित कामासाठी, सोलापूरला वेळेत जाण्यासाठी व सोलापूरहून मंगळवेढ्याकडे निश्चित वेळेत येण्यासाठीची व्यवस्था परिवहन महामंडळाचे अधिकारी करीत नसल्यामुळे एसटीच्या उत्पन्नाची गती मात्र वाढेना.

या एसटीतून प्रवास करणारे प्रवासी ढिम्म प्रवासामुळे त्रस्त होऊ लागले आहेत. सध्या एकाच ठिकाणी नोकरी करणाऱ्या दोघा- चौघांनी एकत्र स्वत:च्या खासगी वाहनाचा पर्याय निवडला.

सध्या मंगळवेढा- सोलापूर मार्गावर सर्व ठिकाणी थांबणाऱ्या बसगाड्या धावत असून, यासाठीचा कालावधी दीड तास निश्चित केल्यामुळे विलंब होत आहे. प्रवाशांनी मागणी केल्यास दोनच थांबे घेणाऱ्या जलद गाड्या सुरू करता येतील.
गुरुनाथ राणे, प्रभारी आगार व्यवस्थापक, मंगळवेढा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com