Grampanchyat : मंद्रूप ग्रामपंचायतीला एक कोटी रुपयांचा पुरस्कार

‘माझी वसुंधरा’तील कामगिरीचा दुसऱ्या क्रमांकाने गौरव
Gram Panchayat
Gram PanchayatAgrowon
Published on
Updated on

सोलापूर ः दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप ग्रामपंचायतीस (Mandroop Grampanchyat) माझी वसुंधरा अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरीसाठी देण्यात येणारा तब्बल एक कोटी रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंतने राज्यात पहिला आणि मंद्रूप ग्रामपंचायतीने दुसरा क्रमांक पटकावला आहे. तब्बल एक कोटी रुपयांचा पुरस्कार मिळवणारी मंद्रूप ही सोलापूर जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे.

Gram Panchayat
Irrigation : शेततळे, सूक्ष्म सिंचनासाठी १२६ कोटी रुपयांचा निधी

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादिन शेळकंदे यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. त्याशिवाय ग्रामसेवक (Gramsevak) नागेश जोडमोटे यांचेही साह्य महत्त्वाचे ठरले. माझी वसुंधरा अभियानामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांनी अभियान कालावधीमध्ये केलेल्या कामाचे डेस्कटॅाप मूल्यमापन आणि फिल्ड मूल्यमापन त्रयस्थ यंत्रणेमार्फत करण्यात आले. या दोन्ही मूल्यमापनामध्ये एकूण गुणांच्या आधारे हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

Gram Panchayat
Government Fund : सोलापूर- पंढरपूर मार्गासाठी २० कोटी रुपयांचा निधी

माझी वसुंधरा अभियानांतर्गत उच्चतम कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना पुरस्काराच्या रकमेचे वितरण आणि पुरस्काराच्या रकमेच्या विनियोगाची कार्यपद्धती शासनाने निश्‍चित केली आहे, यात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मंद्रूपने राज्यात द्वितीय क्रमांक मिळवला आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी या अभियानासाठी आम्ही चळवळ उभी केली, यासाठी झटलेल्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचा हा सन्मान आहे. आमच्या कामाची योग्य दखल घेतली गेल्याने समाधान वाटते, असे ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com