MPKV Rahuri : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा डॉ. आंबेडकर विद्यापीठाशी करार

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, रायगड यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे.
MPKV, Rahuri
MPKV, Rahuri Agrowon

नगर : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी (MPKV Rahuri) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar University) तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, रायगड यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. उभयतांमध्ये संशोधन, नवकल्पना, उद्योजकता आणि शैक्षणिक तसेच विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या देवाणघेवाणीला प्रोत्साहन देणे हा या सामंजस्य कराराचा मुख्य उद्देश आहे.

MPKV, Rahuri
MPKV, Rahuri : शेती उत्पन्न वाढीत शास्त्रज्ञांचाही हातभार

या माध्यमातून उभयंतांमध्ये तंत्रज्ञान अदान-प्रदान करण्यास तसेच उद्योजकता, संशोधन प्रकल्प आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीस चालना मिळेल असा विश्‍वास महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी व्यक्त केला.

MPKV, Rahuri
MPKV, Rahuri : महात्मा फुले कृषी विद्यापीठात शुक्रवारी पदवीदान समारंभ

कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी विश्‍वनाथ काळे यांचे उपस्थितीत कृषी महाविद्यालय, पुणे येथे या करारावर स्वाक्षरी झाली.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीने अधिष्ठाता (कृषी) डॉ. उत्तम चव्हाण आणि सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासाळकर तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. बी. एफ. जोगी आणि डॉ. पी. ए. पवार यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

संसाधन सामायिकरण, कृषिविषयक डिजिटल तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान, नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापन, विस्तार व सामाजिक शास्त्र या क्षेत्राशी निगडित प्रमाणपत्र, पदविका, पदवी तसेच आचार्य अभ्यासक्रमात संयुक्त भागीदारी, विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याकरिता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कार्यशाळा, संमेलन, परिषद आणि प्रशिक्षण कार्यक्रमांचे संयुक्त आयोजन असे या कराराच्या संयुक्त भागीदारीचे स्वरूप आहे. आगामी पाच वर्षं या कराराची मुदत असणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com