
नागपूर : ‘‘नजीकच्या काळात आपल्याला दिसेल आणि गेल्या चार महिन्यात काय केले आणि अडीच वर्षांत त्यांनी काय केले हेही दिसेल. भविष्यामध्ये महाराष्ट्रात येणारे मोठे प्रकल्पसुद्धा (Industrial Project In Maharashtra) आपल्याला दिसतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राज्य सरकारला आश्वस्त केले आहे, की या राज्यात मोठे उद्योग आणि रोजगार निर्मिती (Employment Generation) करू. पंतप्रधान आणि उपमुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो की त्यांनी दोन हजार कोटी रुपये दिले,’’ असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री शिंदे यांचे शनिवारी (ता.१२) सकाळी नागपुरात आगमन झाले. येथून ते भंडारा येथे विविध कार्यक्रमांसाठी रवाना झाले. त्यापूर्वी विमानतळावर पत्रकारांशी ते बोलत होते. जितेंद्र आव्हाड यांना मॉलमध्ये मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली.
यासंदर्भात विचारले असता ‘‘जितेंद्र आव्हाड यांच्यावर पोलिसांनी जी कारवाई केली, ती कायदेशीर आहे. त्यामध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप नाही,’’ असे ते म्हणाले. संजय राऊत यांच्या प्रश्नावर ‘संजय राऊत मोठे नेते आहेत’, येवढेच बोलून त्यांनी हा विषय संपवला.
शिंदे म्हणाले, ‘‘आमचे सरकार हे विकास कामांना प्राधान्य देते. अडीच वर्षात जी कामं प्रलंबित होती, त्यांना चालना देण्याचे काम गेल्या तीन चार महिन्यांत करतोय. राज्याचा सर्वांगीण विकास करणे, यावर आमचा फोकस आहे आणि जे प्रकल्प थांबले आहेत, त्यांना पुढे नेण्याचे काम आम्ही करतोय. कुठलाही प्रकल्प असा तीन-चार महिन्यांत येतो आणि जातो, असे होत नाही. ’’
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.