Ethanol Production | Ethanol Project
Ethanol Production | Ethanol ProjectAgrowon

Ethanol Production : इथेनॉलच्या निर्मितीत राज्य देशात आघाडीवर

इथेनॉल निर्मिती प्रकल्पात राज्य देशात आघाडीवर आहे. महाराष्ट्रात वार्षिक २६८ कोटी लिटर क्षमतेचे इथेनॉल प्रकल्प उभारण्यात आले आहेत.

कोल्हापूर : इथेनॉल निर्मिती (Ethanol Production) प्रकल्पात राज्य देशात आघाडीवर आहे. महाराष्ट्रात वार्षिक २६८ कोटी लिटर क्षमतेचे इथेनॉल प्रकल्प (Ethanol Project) उभारण्यात आले आहेत. यामध्ये मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉल प्रकल्पांची संख्या ११६ आहे. तर धान्यापासून तयार होणाऱ्या इथेनॉल प्रकल्पांची संख्या २८ इतकी आहे. या खालोखाल उत्तर प्रदेशमध्ये २०८ कोटी लिटर क्षमतेचे प्रकल्प उभारण्यात आले आहेत.

Ethanol Production | Ethanol Project
Ethanol Production : इथेनॉल प्रकल्पांची संख्या १४० च्या पुढे जाणार

गेल्या दोन वर्षांमध्ये प्रकल्पांची संख्या लक्षणीय वाढली आहे. राज्यातील साखर कारखान्यांनी इथेनॉल प्रकल्पाला सर्वाधिक पसंती दिली आहे. गेल्या दोन वर्षांपासून केंद्राने सातत्याने इथेनॉलचे दर वाढविल्याने इथेनॉलनिर्मिती फायदेशीर ठरत आहे. केंद्राने सुविधाही प्राधान्याने दिल्याने इथेनॉलनिर्मिती प्रकल्पात वाढ झाली असल्याचे केंद्रीय सूत्रांनी सांगितले.

Ethanol Production | Ethanol Project
Ethanol Production : इथेनॉल उत्पादन, साठवणुकीचे आव्हान

‘राष्ट्रीय जैव इंधन धोरण २०१८’ अंतर्गत वेगवेगळ्या पिकांपासून इथेनॉल तयार करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये भात, मका, खराब झालेला तांदूळ, गहू आदींचा समावेश आहे. नुकतीच इथेनॉलवरील जीएसटी पाच टक्क्यांपर्यंत घटविला आहे. ‘इथेनॉल इंटरेस्ट सबवेंशन’ अंतर्गत देखील आर्थिक साह्य देण्यात येत आहे.

त्यामुळे इथेनॉल प्रकल्पांची संख्या वाढली आहे. उत्तर प्रदेशमध्ये महाराष्ट्राखालोखाल इथेनॉल प्रकल्पांची संख्या आहे. उत्तर प्रदेशात ५८ प्रकल्प मोलॅसिसवर आधारित, तर केवळ दोन प्रकल्प धान्यावर आधारित आहेत. एकूण प्रकल्प क्षमता २०८ कोटी लिटरची आहे. उत्तर प्रदेशाखालोखाल कर्नाटकात ११८ कोटी लिटर क्षमतेचे प्रकल्प उभारण्यात आले आहेत.

देशाची क्षमता ९४७ कोटी लिटर

भारताची इथेनॉलनिर्मिती प्रकल्पांची क्षमता ९४७ कोटी लिटर इतकी झाली आहे. एकूण २६३ प्रकल्प मोलॅसिसवर आधारित आहेत. १२३ प्रकल्प धान्यावर आधारित आहेत. मोलॅसिसवर आधारित इथेनॉल प्रकल्पाची क्षमता ६१९ कोटी, तर धान्यावर आधारित प्रकल्पांची क्षमता ३२८ कोटी लिटर इतकी आहे.

‘पेट्रोलमध्ये इथेनॉल २० टक्क्यांपर्यंत जाईल’

केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरणमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी लोकसभेत विचारलेल्या एका लेखी प्रश्‍नावर उत्तर देताना देशातील इथेनॉलनिर्मिती प्रकल्पांचा आढावा घेतला. पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण दहा टक्क्यांवर पोहोचले आहे. लवकरच ते २० टक्क्यांपर्यंत जाईल, असा विश्‍वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com