Mahabij : ग्रामबीजोत्पादन योजनेअंतर्गत ‘महाबीज’ आपल्या दारी उपक्रम

कार्यक्रमाची अकोटमध्ये सुरुवात
Mahabij
MahabijAgrowon
Published on
Updated on

अकोला ः ग्रामबीजोत्पादन योजनेअंतर्गत बिजोत्पादन प्रशिक्षण चर्चासत्राच्या माध्यमातून महाबीज (Mahabij) आपल्या दारी या संकल्पनेला सुरुवात करण्यात आली. महाबीजचे संचालक डॉ. रणजित सपकाळ यांच्याहस्ते याचे उद्‍घाटन झाले.

Mahabij
'तुम्ही थांबा घरी, भाजीपाला, फळे मिळेल आपल्या दारी’

‘महाबीज’चे भागधारक बीजोत्पादक असलेल्या शेतकऱ्यांसाठी अकोट येथे ग्रामबीजोत्पादन योजनेअंतर्गत प्रशिक्षण चर्चासत्र झाले. या वेळी महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक संतोष आळसे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून पंदेकृविच्या कीटकशास्त्र विभागाचे सहयोगी प्रा. डॉ. सुनील मलकारे, उपविभागीय कृषी अधिकारी सुशांत शिंदे उपस्थित होते. महाबीजचे व्यवस्थापन युवा पिढीकडे असून महामंडळास पुढे नेण्याची पूर्ण क्षमता त्यांच्यात आहे. महाबीज ही शेतकऱ्यांची बियाणे कंपनी म्हणून ओळखली जात असल्याने महाबीजने सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून त्यांच्या सेवेत तत्पर असणे आवश्यक आहे. नवनवीन अधिक उत्पादनशील पीक वाण, गुणवत्तापूर्ण जैविक उत्पादने, उतिसंवर्धित केळी व इतर रोपे शेतकऱ्यांना उपलब्ध करून त्यांच्या आर्थिक प्रगतीत महाबीजने साथ देण्याची गरज आहे, असे डॉ. सपकाळ म्हणाले.

Mahabij
पीकविमा जागृतीसाठी केंद्र सरकार १ कोटी शेतकऱ्यांच्या दारी

शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी महामंडळाचा बीजोत्पादन कार्यक्रम तसेच ग्रामबीजोत्पादन योजना कशी फायदेशीर आहे, कृषी विभागाच्या शासकीय योजनांचा लाभ कसा घेऊन कशी समृद्धी आणता येईल, तसेच महाबीजच्या नवीन संशोधित वाणांची माहिती श्री. आळसे यांनी अध्यक्षीय भाषणात दिली. ग्रामबीजोत्पादन योजनेअंतर्गत महाबीजकडून आयोजित बीजोत्पादन प्रशिक्षण व सत्रास प्रामुख्याने रमेश हिंगणकर, हिदायत पटेल, शिरिष धोत्रे, संजय गावंडे, अनुप धोत्रे, कैलास गोडचवर, नीलेश पावडे, यांच्यासह इतर उपस्थित होते. या प्रसंगी प्रगतिशील बीजोत्पादक शेतकरी पांडुरंग गहले, कांतीराम गहले, निलेश देशमुख, राजेंद्र डिक्कर, पंजाबराव बोचे यांचा महाबीज कडून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास महाबीजचे विभाग प्रमुख डॉ. प्रफुल्ल लहाने, विवेक ठाकरे, प्रशांत पागृत व प्रकाश टाटर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी महाबीजचे अकोला विभागाचे विभागीय व्यवस्थापक जगदीश खोकड यांच्यासह इतर उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com