Milk Production : विदर्भात दुग्धोत्पादनाला ‘माफसू’ देणार बळ

विदर्भ, मराठवाड्यात दुग्धोत्पादनासोबतच चारा उत्पादनाला चालना मिळावी याकरिता राष्ट्रीय डेअरी विकास मंडळ (एनडीडीबी) कडून प्रयत्न केले जात आहे.
Milk production
Milk productionAgrowon

नागपूर ः विदर्भ, मराठवाड्यात दुग्धोत्पादनासोबतच (Milk Production) चारा उत्पादनाला (Fodder Production) चालना मिळावी याकरिता राष्ट्रीय डेअरी विकास मंडळ (एनडीडीबी) (NDDB) कडून प्रयत्न केले जात आहे. याच प्रकल्पामुळे गेल्या काही वर्षांत दोन्ही विभागांत दीड लाख लिटरवरून दूध संकलन (Milk Collection) दुपटीने वाढत तीन लाखांवर पोहोचले आहे.

त्यात आणखी वाढ नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्यावर भर दिला जात असून, त्याकरिता एनडीडीबीने महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाशी (माफसू) करार केला आहे. वर्षभरात सुमारे १४४० शेतकऱ्यांना या माध्यमातून प्रशिक्षित केले जाणार आहे.

Milk production
Milk Production : दूधवाढीसाठी दिले ऑक्सिटोसिन औषध

सिंचनाच्या अत्यल्प सुविधेमुळे उन्हाळी पिकांखालील क्षेत्र कमी, चारा पिकांच्या उत्पादनात वन्यप्राण्यांचा अडसर, मजूरांची उपलब्धता नसणे अशा अनेक कारणांमुळे विदर्भाची गेल्या काही वर्षात दुग्धोत्पादनात पिछेहाट झाली.

नगर, जळगाव या जिल्ह्यातून होणाऱ्या दुधाच्या पुरवठ्यावरच या भागाची गरज भागत होती. दरम्यान, विदर्भातील हे चित्र बदलावे याकरिता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला.

Milk production
Milk Production : विदर्भातील दूध उत्पादन तीस लाख लिटरवर नेणार

‘एनडीडीबी’च्या सहकार्याने त्यांनी दुग्धोत्पादनाला चालना मिळावी याकरिता प्रकल्प प्रस्तावित केला. त्यामुळे विदर्भ, मराठवाड्याचे चित्र बदलले आहे. अल्पावधीतच या भागातील दुग्धोत्पादन तीन लाख लिटरवर पोहोचले. त्यात आणखी वृद्धी व्हावी याकरीता ‘एनडीडीबी’कडून प्रयत्न होत आहे.

त्याचाच एक भाग म्हणून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी विदर्भात तीन ठिकाणी सूक्ष्म प्रशिक्षण केंद्राची उभारणी केली आहे. याकरीता निधीची उपलब्धता एनडीडीबीने केली असून प्रकल्पाची अंमलबजावणी माफसू मार्फत होत आहे. वर्षभरात ४५ प्रशिक्षण घेण्याचे याद्वारे प्रस्तावीत आहे. प्रशिक्षणार्थी निवडीची प्रक्रिया एनडीडीबीच्या जिल्हास्तरावरील प्रतिनिधींमार्फत होते.

१४४० प्रशिक्षणार्थ्यांना यातून तंत्रशुद्ध दुग्धोत्पादनाचे धडे देण्यात येणार आहेत. पावसाळ्यात प्रशिक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी झाली नाही. परिणामी वर्षभराकरिता या प्रकल्पाला मुदतवाढ मिळावी, अशी मागणी ‘माफसू’ प्रशासनाकडून होत आहे.

विदर्भ, मराठवाड्यात दुग्धोत्पादनाला चालना मिळावी याकरिता सूक्ष्म प्रशिक्षण केंद्राची संकल्पना ‘एनडीडीबी’ची आहे. दुग्धोत्पादनाकरिता इच्छुक शेतकऱ्यांना या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाते. तीन प्रगतिशील शेतकऱ्यांची निवड करीत त्यांच्या माध्यमातून अमरावती, वर्धा, नागपूर जिल्ह्यांत हे प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. हे शेतकरी मास्टर ट्रेनर म्हणून वर्षभरात १४४० शेतकऱ्यांना प्रशिक्षित करतील.

- डॉ. अनिल भिकाने, संचालक, विस्तार शिक्षण, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com