Raigad : रायगडमधील स्‍थानिक बंदरे असुरक्षित

दहशतवादी कारवायांबरोबरच डिझेल चोरी, रेती उत्‍खननाचा धोका
Angre Port
Angre PortAgrowon
Published on
Updated on

अलिबाग ः पूर्वीपासून व्यापारासाठी प्रसिद्ध असलेली रेवदंडा व परिसरातील बंदरे आधुनिक काळात सुरक्षा साधनांअभावी दिवसेंदिवस संवेदनशील होत आहेत. त्यामुळे सागरी सुरक्षा धोक्यात येण्याची शक्‍यता आहे. सीसी टीव्हीअभावी अलिबाग तालुक्यातील रेवदंडा, थेरोंडा, आग्राव, मुरूड तालुक्यातील बोर्ली, तारा बंदर असुरक्षित असल्याचे चित्र दिसत आहे.

Angre Port
Pune APMC : ‘डमी’ अडत्यांमुळे शेतकरी असुरक्षित

व्यापारासह पर्यटन व ऐतिहासिक स्थळ म्हणून रेवदंड्याची वेगळी ओळख आहे. या बंदरावर व्यापार करण्यासाठी पोर्तुगीज उतरले. पर्यटनाच्या दृष्टीनेदेखील रेवदंडा नावारूपाला येत आहे. परिसरातील ऐतिहासिक मंदिरे, गडकिल्ले, समुद्रकिनारा पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षण ठरत आहेत. याच परिसरात रेवदंडा, बोर्ली, थेरोंडा, आग्राव, तारा बंदर, साळाव ही बंदरे असून या बंदरांवर मोठ्या प्रमाणात मासळी उतरविली जाते.

Angre Port
रायगडमधील दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसनासाठी १३ कोटीचा निधी 

जिल्ह्याच्या २४० किमीच्या किनारपट्टी, कुंडलिका, सावित्री, अंबा नद्यांच्या पात्रातही अनेक नैसर्गिक बंदरे आहेत. मालाची चढ-उतार सहज करणे शक्य असलेली ही बंदरे नागरी वस्तीपासून दूर असल्याने बंदरांचा वापर देशविघातक कारवायांसाठी होण्याची भिती अधिक आहे. पावसाळ्यात तर ही सुरक्षा पूर्णपणे वाऱ्यावर असते. पोलिस, नौदलाच्या नौकांद्वारे होणारी सागरी गस्त पूर्णपणे बंद असते. याच दरम्यान मासेमारीही बंद असते, त्यामुळे खोल समुद्रात घडणाऱ्या संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे सुरक्षा यंत्रणांना कठीण होते. बंदर परिसर, जेटीवर सीसी टीव्ही नसल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. मुंबईमध्ये झालेले हल्ल्‍यांची पार्श्वभूमी जिल्ह्यातील बंदरांना जोडणारी आहे. श्रीवर्धनमधील शेखाडी येथे उतरलेले आरडीएक्स हे त्‍यापैकीच एक उदाहरण. दहशतवादी कारवायांबरोबरच डिझेल चोरी, रेती उत्‍खनन, अमली पदार्थांची तस्‍करी आदींसाठीही मुख्य शहरापासून दूर असलेल्या बंदराचा उपयोग होत असल्‍याचे समोर आले आहे.

रेवदंडा हद्दीतील वेगवेगळ्या बंदराची पाहणी केली. नागरी सुरक्षेच्या दृष्टीने थेरोंडा, आग्राव, तारा, बोर्ली, साळाव, रेवदंडा जेटी परिसरात सीसी टीव्ही बसवण्याच्या सूचना केल्‍या आहेत. मच्छीमारांशीही चर्चा केली आहे.

- देवीदास मुपडे, पोलिस निरीक्षक, रेवदंडा

बंगला बंदरातून डिझेल चोरी

नागरी वस्तूपासून दूर असलेल्या बंदरामध्ये पहाटेच्या वेळी मासळी उतरली जाते. त्यानंतर बंदरावर वर्दळीचे प्रमाण कमी होते. दुपारनंतर तर अनेक ठिकाणी शुकशुकाट असतो. त्याचा फायदा घेत वाळू उत्‍खननासह डिझेल चोरी, अमली पदार्थाची तस्‍करी होण्याची शक्‍यता आहे. अलिबाग तालुक्यातील बंगला बंदरातून डिझेलची तस्‍करी झाल्‍याचे मध्यंतरी उघड झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com