
Solapur News : ्या वतीने एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह साजरा होत आहे. या अनुषंगाने तालुक्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या माध्यमातून करकंब (ता. पंढरपूर) येथील भूविकास बँकेच्या २३ खातेधारक शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावरील कर्ज बोजाच्या नोंदी कमी केल्या. त्यामुळे या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.
पूर्वी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले जावे, त्यांची आर्थिक भरभराट व्हावी, यासाठी शेतीच्या विकासाकरिता भूविकास बँक दीर्घकालीन कर्ज अदा करत होती. या कर्जाच्या नोंदी संबंधित शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावर घेण्यात आल्या होत्या. परंतु आर्थिक अडचणीमुळे अनेक शेतकऱ्यांना ही कर्जे फेडता आली नाहीत.
परिणामी, शेत जमिनीच्या उताऱ्यावरील भूविकास बँकेच्या बोजामुळे कर्ज काढणे, गहाण ठेवणे, हस्तांतरण करणे, खातेफोड करणे व शेती विक्री कामात अडचणी येत होत्या. मात्र शासनाच्या नऊ नोव्हेंबर २०२२ च्या शासन निर्णयानुसार भूविकास बँकांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात आला व या बँकांच्या कर्जदारांची संपूर्ण कर्ज रक्कम माफ करण्यात आली.
बोजा कमी केलेल्या उताऱ्याचे वाटप
महसूल सप्ताहानिमित्त करकंब (ता. पंढरपूर) येथील रामभाऊ जोशी हायस्कूल येथे युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रातांधिकारी गजानन गुरव यांच्या हस्ते शेतकऱ्यांना भूविकास बँकेचे कर्ज बोजे कमी केलेल्या साता-बारा उताऱ्याचे वाटप करण्यात आले.
या वेळी अपर तहसीलदार तुषार शिंदे, नायब तहसीलदार सायली जाधव- नाईक, मंडळ अधिकारी चंद्रकांत ढवळे, तलाठी दादा पाटोळे, नीलेश कुंभार, कोतवाल कुंडलिक शिंदे, गुलाब कोरबू, प्राचार्य हेमंत कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख, उपसरपंच आदिनाथ देशमुख, माजी पंचायत सदस्य राहुल पुरवत आदी उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.