Agriculture Business Loan
Agriculture Business LoanAgrowon

Agriculture Business Loan : शेतीपूरक व्यवसायाच्या कर्ज रकमेत २० हजार रुपयांची वाढ

खेळते भांडवली खर्चाचे कर्जाची रक्कम जाहीर

संदीप नवले
Agriculture Loan : पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २०२३-२४ च्या शेती हंगामासाठी ‘किसान क्रेडिट कार्ड’ (Kisan Credit Card Scheme) योजनेअंतर्गत शेतीपूरक व्यवसायासाठी खेळते भांडवली खर्चाचे कर्जाची रक्कम जाहीर केली आहे.

यामध्ये २० हजार रुपयांपर्यंतची वाढ केली असून त्याचा लाभ पूरक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना होणार आहे.

राज्य शासनाच्या तांत्रिक समितीने शेतीपूरक व्यवसायासाठी खेळते भांडवली खर्चाचे निश्चित केलेल्या रकमेसंदर्भात प्रगतिशील शेतकरी, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, प्रगतिशील शेतकरी, बँकेचे वरिष्ठ अधिकारी यांच्यामध्ये नुकतीच बैठक झाली होती.

या बैठकीत खेळते भांडवली खर्चाच्या कर्ज रकमेत वाढ करण्याचे निश्चित केले गेले. चालू आर्थिक वर्षामध्ये ठरविलेल्या दरानुसार शेतकऱ्यांना कर्जाचे वितरण करण्यात येणार आहे.

Agriculture Business Loan
Loan Scheme : थेट कर्ज योजनेसाठी इच्छुकांना अर्जासाठी २० डिसेंबरची मुदत

पूरक व्यवसाय करताना शेतकऱ्यांचा खर्च वाढत असल्याने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पीक कर्जासाठीची रक्कम जाहीर केली. यंदा गाय, म्हैस, शेळी, मेंढी, कुक्कुटपालनाचा व्यवस्थापन खर्च, मत्स्य व्यवस्थापन खर्चासाठी जवळपास २० हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे.

याशिवाय गाय, म्हैस, शेळी व मेंढी यांना एक वर्षाच्या कालावधीचे विम्याचे संरक्षण देण्यात आले आहे. शेतकऱ्यांना एक गाय घेण्यासाठी वीस हजार रुपये, एक म्हैस घेण्यासाठी २५ हजार रुपये, तर ११ शेळ्या, मेंढ्या घेण्यासाठी २० हजार रुपयांचे कर्ज व यासोबत विमा संरक्षण देण्यात येणार आहे.

Agriculture Business Loan
Agriculture Land Loan : धरणात बुडाले कर्ज

याशिवाय बॉयलर, लेयर व गावठी शंभर पक्षी कुक्कुटपालन व्यवस्थापनासाठी १० ते २५ हजार रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येणार आहे. यामध्ये बॉयलरसाठी दहा हजार रुपये, तर लेयर, गावरान कोंबडी कुक्कुटपालनासाठी २५ हजार रुपये कर्ज दिले जाणार आहे.

मत्स्य व्यवस्थापनामध्ये दहा गुंठे शेततळ्यांमध्ये सर्व जातीचे मत्स्यपालन करण्यासाठी २२ हजार रुपयांचे कर्ज देण्यात येणार आहे. तर, नदी-तलावामध्ये छोट्या नावेच्या साहाय्याने मत्सव्यवसाय करण्यासाठी ८ हजार रुपयांचे कर्ज देण्यात येणार आहे.

यासाठीची मर्यादा एक वर्ष असून गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी १० ते २० हजार रुपयांची कर्जदरात वाढ करण्यात आली आहे.

सभासदाची पात्रता व निकष : - अर्जदार शेतकरी विविध कार्यकारी संस्थेचा ‘अ’ वर्ग सभासद असावा. - सभासदास व्यक्तिगत कर्ज मागणी करता येईल. - पीककर्जाशिवाय अन्य मध्यम मुदत कर्ज असले तरी चालेल, परंतु थकीत नसावे. -

तारण देणारी जमीन निर्वेध असावी. - पूर्वीचा गाय, म्हैस, शेळी, मेंढी, पक्षी, मत्स्य इ. संबंधित व्यवसाय सुस्थितीत असावा.

- सभासद बँकेचा किमान तीन महिने सक्रिय खातेदार असावा.

- संबंधित सभासदाचे दूध बिल बँकेच्या शाखेत मागील किमान सहा महिने जमा झालेले पाहिजे.

- कर्जपुरवठा फक्त विकास कार्यकारी सहकारी संस्थेमार्फतच केला जाईल. कोट शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय करताना अडचणी येऊ नये म्हणून खेळते भांडवल म्हणून कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.

दा गाय, म्हैस, शेळी, मेंढी या शेतीपूरक व्यवसायासाठी कर्जाची रक्कम जाहीर केली आहे. याशिवाय विम्याचाही समावेश करण्यात आला आहे. डॉ. दिगंबर दुर्गाडे, अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com