Farmer Subsidy : जिवंत शेतकऱ्यांना शासन दफ्तरी दाखविले मृत

शासकीय कामकाजाच्या तऱ्हाच न्याऱ्या असतात. जिवंत माणसे मृत दाखवली जातात, तर कधी मेलेल्याच्या खात्यात अनुदान वळती केल्याचे प्रकारही समोर येत असतात.
Farmer Subsidy
Farmer SubsidyAgrowon
Published on
Updated on

बुलडाणा : शासकीय कामकाजाच्या तऱ्हाच न्याऱ्या असतात. जिवंत माणसे मृत दाखवली जातात, तर कधी मेलेल्याच्या खात्यात अनुदान (Subsidy) वळती केल्याचे प्रकारही समोर येत असतात.

जिल्ह्यातील चिखली तालुक्यात शेतकरी जिवंत (Alive Farmer Shown Dead) असतानाही त्यांना शासन दफ्तरी मृत दाखवल्याने ते शेतकरी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत. वंचित कशामुळे आहोत, याचा शोध या शेतकऱ्यांनी घेण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना आपण मृत दाखवलेले असल्याचे समजल्याने धक्काच बसला.

Farmer Subsidy
Farmer Suicide : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना लवकरच मदत

ही बाब ‘स्वाभिमानी’चे विनायक सरनाईक यांना समजल्यानंतर त्यांनी जिवंत असलेल्या त्या शेतकऱ्यांना सोबत घेत थेट तहसील कार्यालय गाठले. या शेतकऱ्यांना अनुदान द्या, अन्यथा आंदोलन करू असा इशाराही दिला.

या बाबत अधिक माहिती अशी, चिखली तालुक्यात काही गावांतील शेतकरी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या अनुदानापासून वंचित ठेवले जात आहेत.

हे शेतकरी आपल्याला लाभ का मिळत नाही यासाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठेही झिजवत आहेत. यापैकी काहींनी खोलात जाऊन कारणे शोधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना धक्काच बसला.

Farmer Subsidy
Farmer Suicide : पंधरा तासाला एक शेतकरी आत्महत्या

आपण जिवंत असताना शासनाच्या दरबारी मात्र अनेक मयत अशी नोंद झाल्याने सन्मान योजनेचा निधी मिळाला नसल्याचे समजले. अखेरीस या शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांना हा प्रकार सांगितला.

सरनाईक यांनी तातडीने या शेतकऱ्यांना सोबत घेत तहसीलदारांचे कार्यालय गाठले. जिवंत असलेल्या शेतकऱ्यांना मयत दाखवणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा, वंचित शेतकऱ्यांना तातडीने सन्मान योजनेचे अनुदान द्या, अन्यथा स्वाभिमानी स्टाइल आंदोलन करू, असा इशारा दिला.

केंद्र शासनाकडून पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेद्वारे ४ महिन्याला २ हजार याप्रमाणे वर्षाला ६ हजार रुपये मदत दिली जाते. यासाठी शेतकऱ्यांचा सातबारा, खाते आणि बॅंक खाते जोडले आहे. ई-केवायसी झालेली नाही काही शेतकरी आपोआप वगळल्या गेले.

मात्र जिवंत असलेले शेतकरी मयत दाखवण्यात आहे. चिखली तालुक्यातील शेलोडी येथील अरुण बापू नेमाने, मनोहर नारायण वाळस्कर, मधुकर दौलत नेमाने तर अंबाशी येथील वसंता पुंडलिक वाडेकर यासह अनेक शेतकरी जिवंत असताना मयत दाखविण्यात आले आहेत.

प्रकरणाची चौकशी करा

चिखली तालुक्यातील शेतकरी सन्मान योजनेचे पैसे मिळत नसल्याने तहसिल कार्यालयात चकरा मारत आहेत. परंतु ही योजना कृषी व महसुलाच्या श्रेयवादात अडकली आहे. अनेक शेतकऱ्यांना जिवंत असताना मयत दाखवल्या गेले आहे. याची चौकशी करायला हवी. वंचित शेतकऱ्यांना योजनेची रक्कम अदा करून प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी स्वाभिमानी संघटनेचे विनायक सरनाईक यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com