युक्रेनमधील शेतकऱ्यांची पेरणी कुठवर आली?

युक्रेनमधील युद्ध अजूनही धुमसत आहे. मात्र तरीही अनेक भागांत शेतकऱ्यांनी पेरणी सुरु केली. मात्र यात शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यंदा येथे खुपच कमी पेरणी होण्याची शक्यता आहे. युक्रेनमधील पेरणीची काय परिस्थिती आहे? आत्तापर्यंत किती हेक्टरवर लागवड झाली?
Ukraine
Ukraineagrowon
Published on
Updated on

1. पावसाला पोषक हवामानामुळे राज्याच्या विविध भागात ढग जमा होत आहे. ढगाळ हवामानामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. तर उन्हाचा चटका देखील कायम आहे. उद्या कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात उन्हाचा चटका कायम आहे. ढगाळ हवामानामुळे काही ठिकाणी कमाल तापमानात घट झाल्याचे दिसून येत आहे.

2. रशिया आणि युक्रेनमधील(Russia and Ukraine) युद्धामुळे जागतिक पातळीवर गव्हाचा तुटवडा निर्माण झाला. परिणामी गव्हाचे दर तेजीत आहेत. बाजारातील मागणी आणि दर लक्षात घेता ब्राझीलमधील शेतकरी यंदा गव्हाला पसंती देतील, असा अंदाज आहे. त्यामुळे ब्राझीलच्या गहू पेरणी आणि उत्पादनात विक्रमी वाढ होण्याची शक्यता येथील काही संस्थांंनी व्यक्त केली. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा येथे गहू लागवड २०.६ टक्क्यांनी वाढून ३४ लाख हेक्टरवर पोचण्याचा अंदाज आहे. तर उत्पादन १०० लाख टनांवर पोचेल, असं या संस्थानी म्हटले. परंतु येथील सरकारी संस्था कोनाबने गहू उत्पादन ७९ लाख टनांवर स्थिरावेल, असा अंदाज जाहिर केला.

. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर वाशी आणि लासलगाव येथून अमेरिका तसेच ऑस्ट्रेलियाला आंबा निर्यात(Mango export) सुरू झाली. मात्र इंधनाचे दर वाढल्यामुळे हवाई वाहतुकीचे दर तिप्पट झाले. त्याचा भुर्दंड व्यावसायिकांना बसणार आहे. मुंबईतील वाशी विक्री केंद्रातून ११ टन आंबा निर्यात झाला. त्यामध्ये साडेतीन टन हापूस अमेरिकेला आणि दीड टन ऑस्ट्रेलियाला गेला. भारतातील आंब्याला विविध देशांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. निर्यातीपूर्वी विविध प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. अमेकिरेला आंबा पाठविताना विकीरण प्रक्रिया बंधनकारक आहे. वाशी, लासलगाव या दोन ठिकाणी ही सुविधा उपलब्ध आहे. हंगाम सुरू करण्यापूर्वी अमेरिकेतील कृषी विभागाकडून विक्री केंद्रांची पाहणी करून सर्टिफिकेट दिले जाते.


4. गाईच्या दूध भुकटीस(Milk powder) देशांतर्गत बाजारात किलोस सरासरी ३०५ रुपयांपर्यंत दर मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातही ३०० रुपयांच्यावर दर गेला. म्हशीच्या दूध भुकटीस देशांतर्गत बाजारात किलोस ३२५ रुपयेपर्यंत दर आहे. सध्या उन्हाळ्यामुळे पशुपालकांकडून दुधाचा पुरवठा घटला. जितके दूध येईल, तितक्या दुधाची विक्री होत आहे. त्यामुळे दूध भुकटी करण्याचे प्रमाण प्रचंड कमी झाले. अनेक नामवंत दूध संघांमध्ये दूध भुकटी करण्याऐवजी आलेले दूध थेट विकण्यास प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे स्टॉक झपाट्याने संपत आहे. यामुळे बाजारांमध्ये दूध भुकटीची टंचाई जाणवत आहे.5. युक्रेनमधील युद्ध अजूनही धुमसत आहे. मात्र तरीही अनेक भागांत शेतकऱ्यांनी पेरणी सुरु केली. येथे सध्या वसंत ऋतुतील पेरणी सुरु आहे. मात्र यात शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या संकटातही येथील शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत १९ लाख हेक्टरवर पिकांची लागवड केली, असे युक्रेन कृषी विभागाने सांगितले. कृषी विभागाचे उपमंत्री तारास व्यासोत्स्की यांनी देशातील पेरणीची माहिती माध्यमांना दिली. त्यांनी सांगितले की, देशात मका, सोयाबीन, सूर्यफुल, भरडधान्य, गहू, ओट्स आणि शुगरबीटची लागवड सुरु झाली. शेतकरी मोठ्या हिमतीने लागवडी उरकत आहेत. देशातील खेरसन, ओडेसा, मायकोलायव्ह राज्यांत युद्धजन्य परिस्थितीतही पेरणी सुरु आहे. यंदा सूर्यफुल आणि मका पिकाची लागवड कमी होऊ शकते. तर वाटाणा, बार्ली आणि ओट्सची पेरणी वाढेल. कारण युद्धामुळे बिघडलेल्या परिस्थितीत देशात अन्नधान्य पुरवठा आवश्यक आहे. युक्रेनचे कृषीमंत्री रोमन लेश्चेन्को यांनी नुकताच आपल्या पदाचा राजिनामा दिला. पदावर असताना त्यांनी सांगितले होते की, युक्रेनमध्ये यंदा ७० लाख हेक्टरवर पेरणी होऊ शकते. रशियाने आक्रमण करण्यापुर्वी १५० लाख हेक्टरवर पेरणीचा अंदाज होता. परिस्थिती पाहून युक्रेनच्या सरकारने यापुर्वीच राई, ओट्स, भरडधान्य, मीठ, साखर, मांस आणि पशुधन निर्यातीवर बंदी आणली. गहू, मका आणि सूर्यफुल तेल आयातीसाठी परवाना पद्धत लागू केली. अन्नधान्य टंचाईमुळे युक्रेन सरकारने हा निर्णय घेतला. मात्र पेरणी हळूहळू वाढत असल्याने या देशाला काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Ukraine
वस्त्रोद्योगातील पीएलआयसाठी ६१ प्रस्तावांना केंद्राची संमती

5. युक्रेनमधील (Ukraine)युद्ध अजूनही धुमसत आहे. मात्र तरीही अनेक भागांत शेतकऱ्यांनी पेरणी सुरु केली. येथे सध्या वसंत ऋतुतील पेरणी सुरु आहे. मात्र यात शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या संकटातही येथील शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत १९ लाख हेक्टरवर पिकांची लागवड केली, असे युक्रेन कृषी विभागाने(Department of Agriculture) सांगितले. कृषी विभागाचे उपमंत्री तारास व्यासोत्स्की यांनी देशातील पेरणीची माहिती माध्यमांना दिली. त्यांनी सांगितले की, देशात मका, सोयाबीन(Soybean), सूर्यफुल, भरडधान्य, गहू, ओट्स आणि शुगरबीटची लागवड सुरु झाली. शेतकरी मोठ्या हिमतीने लागवडी उरकत आहेत. देशातील खेरसन, ओडेसा, मायकोलायव्ह राज्यांत युद्धजन्य परिस्थितीतही पेरणी सुरु आहे. यंदा सूर्यफुल आणि मका पिकाची लागवड कमी होऊ शकते. तर वाटाणा, बार्ली आणि ओट्सची पेरणी वाढेल. कारण युद्धामुळे बिघडलेल्या परिस्थितीत देशात अन्नधान्य पुरवठा (Grain supply)आवश्यक आहे. युक्रेनचे कृषीमंत्री रोमन लेश्चेन्को यांनी नुकताच आपल्या पदाचा राजिनामा दिला. पदावर असताना त्यांनी सांगितले होते की, युक्रेनमध्ये यंदा ७० लाख हेक्टरवर पेरणी होऊ शकते. रशियाने आक्रमण करण्यापुर्वी १५० लाख हेक्टरवर पेरणीचा अंदाज होता. परिस्थिती पाहून युक्रेनच्या सरकारने यापुर्वीच राई, ओट्स, भरडधान्य, मीठ, साखर, मांस आणि पशुधन निर्यातीवर बंदी आणली. गहू, मका आणि सूर्यफुल तेल आयातीसाठी परवाना पद्धत लागू केली. अन्नधान्य टंचाईमुळे युक्रेन सरकारने हा निर्णय घेतला. मात्र पेरणी हळूहळू वाढत असल्याने या देशाला काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com