Kharif Sowing : तळोदा तालुक्यात २३ हजार हेक्टरवर पेरा

Kharif Season 2023 : जूनमध्ये अपेक्षित पाऊस न झाल्याने तळोदा तालुक्यातील पेरण्या मोठ्या प्रमाणात खोळंबल्या होत्या व शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा होती.
Kharif Sowing
Kharif Sowing Agrowon
Published on
Updated on

Nandurbar News : जूनमध्ये अपेक्षित पाऊस न झाल्याने तळोदा तालुक्यातील पेरण्या मोठ्या प्रमाणात खोळंबल्या होत्या व शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा होती. मात्र जुलैमध्ये झालेल्या पावसामुळे तालुक्यातील शेतकरी सुखावला असून, या महिन्यात मोठ्या प्रमाणावर पिकांच्या पिरण्या झाल्या आहेत.

आजअखेरपर्यंत सुमारे २३ हजार ८३० हेक्टरवर म्हणजेच नव्वद टकक्यांपेक्षा जास्त क्षेत्रावर शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्या आहेत. सध्या पावसाचा जोर कमी असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी निंदणी, फवारणीच्या कामाला वेग आला आहे.

Kharif Sowing
Kharif Sowing : राज्यात आतापर्यंत ६२ टक्के पेरण्या

तळोदा तालुक्यात खरीप हंगामाच्या पूर्वी अनेकदा अवकाळी पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले होते. मात्र सर्व दुःख बाजूला सारून खरिपात चांगला पाऊस पडेल, या आशेवर तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरिपाच्या तयारी म्हणून मशागतीची कामे पूर्ण करीत पीक लागवडीचे नियोजन केले होते. मात्र जूनमध्ये जेमतेम पावसाने हजेरी लावली.

Kharif Sowing
Kharif Sowing : रावेर तालुक्यात ८० टक्के पेरण्या

त्यामुळे पावसाअभावी तालुक्यातील पेरण्या खोळंबल्या होत्या. जूनपर्यंत तालुक्यात जेमतेम २० टक्के क्षेत्रावरच लागवड झाली. त्यातही कापूस, केळी व पपई या पिकांचाच मोठा वाटा होता. पावसाअभावी शेतकरी हवालदिल झाला होता.

मात्र जुलैमध्ये पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. कधी संततधार तर कधी मुसळधारेमुळे तालुक्यातील शेतकरी सुखावला असून, शेतीकामांनाही वेग आला आहे. सध्या शेतकरी निंदणीसोबतच फवारणीच्या कामाला प्राधान्य देत आहे. यामुळे शेतमजुरांनाही काम मिळाले आहे.

पीक लागवड स्थिती

(लागवड हेक्टरमध्ये)

पीक लागवड

तांदूळ १६०

ज्वारी ७३५

बाजरी १६

मका ५५४

तूर २२५

मूग ५४

उडीद ४५

सोयाबीन २३५२

कापूस ८७३०

एकूण २३८३०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com