Kharif Crop : तुळजापुरात पावसाची ओढ; खरीप पिकांना मोठा फटका

Kharif Season : सोयाबीन, तूर, मूग, उडीद ही पिकांनी माना टाकल्या. चांगला पाऊस पडेल या आशेवर अंतर्गत मशागती केल्या. तसेच सोयाबीन पिकाच्या फवारण्या केल्या.
Kharif Crop
Kharif CropAgrowon
Published on: 
Updated on: 

Tuljapur News : तालुक्यात पावसाने ३० दिवसांचा खंड दिल्याने खरीप पिके वाया गेली आहेत. शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक वाया गेल्याचा मोठा फटका यंदा बसला आहे. तालुक्यात ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठी ओढ दिली आहे.

उपलब्ध असणाऱ्या पाणीसाठ्यातून सोयाबीन पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न चालू आहेत. ऊस पिकाचीही वाढ पावसाअभावी खुंटलेली आहे.

सोयाबीन, तूर, मूग, उडीद ही पिकांनी माना टाकल्या. चांगला पाऊस पडेल या आशेवर अंतर्गत मशागती केल्या.

Kharif Crop
Kharif Season : थोडं थोडं पाणी शिंपडून पिकाचा जीव वाचवायचा प्रयत्न करतोय!

तसेच सोयाबीन पिकाच्या फवारण्या केल्या. सोयाबीनला फुले लागली आहेत. तथापि पावसाअभावी सोयाबीन पिकाची वाढ खुंटलेली आहे. अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन पावसाअभावी वाळून जात आहे.

Kharif Crop
Kharif Season : शेतीची कामे थांबल्याने बियाणे व खतांचे व्यवसाय ठप्प

तालुक्यात तीस साठवण तलाव आहेत. त्यात कोठे तीस टक्के तर काही ठिकाणी चाळीस टक्के पाणीसाठा आहे. कुरनूर, खंडाळा यासह विविध तलावात ३० टक्के एवढा पाणीसाठा आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत १८५ मिलिमीटर एवढा पाऊस झालेला आहे.

ऑगस्ट महिन्यात १८ टक्केच पाऊस झालेला आहे. तालुक्यात पाऊस नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी २६ अधिग्रहण प्रस्ताव उपविभागीय अधिकारी कार्यालयांकडे पाठविण्यात आल्याचे पंचायत समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com