Crop Insurance : खामगाव बाजार समिती विनामूल्य पीकविमा काढून देणार

Crop Insurance Scheme : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी ३१ जुलैपर्यंत नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणीसाठी केवळ काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत.
Crop Insurance
Crop Insurance Agrowon
Published on: 
Updated on: 

Buldana News : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी ३१ जुलैपर्यंत नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणीसाठी केवळ काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. पीकविमा अर्ज भरण्यासाठी येथील बाजार समिती शेतकऱ्यांना सहकार्य करणार आहे.

Crop Insurance
Crop Insurance : पीकविमा योजनेत २६ लाख ५२ हजार शेतकऱ्यांचा सहभाग

बाजार समितीने लोकनेते विलासराव देशमुख शेतकरी सेवा अभियानांतर्गत खामगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा पीकविमा विनामूल्य काढण्याचा ठराव पारित केला आहे. पीकविम्यासाठी असलेली ३१ जुलैची मुदतही शासनाने एक महिन्याने वाढवावी अशी मागणीसुद्धा या ठरावाद्वारे केली आहे.

Crop Insurance
Crop Insurance : पीकविम्यासाठी एकच रुपया घ्यावा : सेवा केंद्रांना सूचना

ऑनलाइन पद्धतीने पीकविमा भरण्यासाठी बाजार समितीच्या वतीने स्थानिक यार्ड संकुलासह लांजूड, पिंपळगावराजा, अटाळी, पळशी, रोहणा व गणेशपूर या गावांमध्ये ऑनलाइन सेवा केंद्राद्वारे हे काम केले जाणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही सेवा केंद्रे सुरू राहतील.

प्रत्येक सेवा केंद्रावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, बाजार समितीचे कर्मचारी शेतकऱ्यांना सहकार्य करण्यासाठी उपस्थित राहतील. पीकविमा अर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनी डिजिटल सातबारा व नमुना ८ ‘अ’, आधार कार्ड, राष्ट्रीयीकृत बँकचे पासबुक, स्वयं घोषणापत्र इत्यादी कागदपत्रे सोबत आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ही बाजार समिती नेहमीच शेतकरी हिताचे निर्णय घेत असते. सध्याची स्थिती पाहता शेतकरी शेतीच्‍या कामात व्‍यस्‍त आहे. त्‍यामुळे त्‍यांच्‍या सोयीसाठी संचालक मंडळाने हा निर्णय घेतला आहे.
- सुभाष पेसोडे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, खामगाव, जि. बुलडाणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.